गुंतवणूकदारांच्या वेगवेगळ्या गरजांप्रमाणे वेगवेगळे इक्विटी फंड्स आहेत. सगळ्यांचे अंतिम ध्येय दीर्घकाळासाठी धनसंचय करणे हेच असते.
ह्याबद्दल नीट समजून घेण्यासाठी आपण ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पाठवलेला संघ बघूया. तिथे खेळाडूंचा मोठा गट असतो आणि वेगवेगळ्या खेळाचे संघही असतात. ऑलिम्पिक गेम्समधला सगळ्यात मोठा सोहळा म्हणजे “ट्रॅक अॅन्ड फिल्ड” सोहळा. आपण ह्या सोहळ्यासाठीही संघ पाठवला जातो. त्यामध्ये, काही शर्यती आहेत - अगदी 100 मीटरपासून ते लांब अंतराच्या शर्यती, मॅरेथॉनसहित. सगळे संघ ऑलिम्पिक गेम्समध्ये भाग घ्यायला गेले तरी तिथे विविध प्रकारचे प्राविण्य असणारे विविध खेळाडूही असणार आहेत.
हेच म्युच्युअल फंड्सच्या बाबतीत आहे. जर सगळ्या म्युच्युअल फंड स्किम्स ह्या संपूर्ण ऑलिंपिक संघासारख्या असतील तर, इक्विटी फंड्स हे विविध ट्रॅक अॅन्ड फिल्ड सोहळ्यात भाग घेणा-या संघासारखे आहेत. जसे आपण बघितले, जसे ट्रॅक अॅन्ड फिल्ड सोहळ्यात विविध प्रकार असतात तसेच इक्विटी फंड्स मध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्किम्स असतात.