इतर मालमत्ता विभागाप्रमाणे म्युच्युअल फंड्सचे परतावे हे आपल्या सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या तुलनेत एका ठराविक कालावधीमध्ये आपल्या गुंतवणुकीच्या मूल्याचे अधिमूल्यन करून मोजले जातात. एखाद्या म्युच्युअल फंड्सची नेट अॅसेट व्हॅल्यू त्याची किंमत दर्शवते आणि ती आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीमधील परतावे मोजण्यासाठी वापरली जाते. एखाद्या कालावधीमधील परतावे हे विक्रीच्या आणि खरेदीच्या तारखेच्या एनएव्ही मधील फरकाचा खरेदीच्या दिवसाच्या एनएव्ही बरोबर भागाकार करून त्या उत्तरला 100 ने गुणून त्याची टक्केवारी काढली जाते. कोणताही नेट डिव्हीडंट* किंवा त्या फंडचे धारण कालावधीमध्ये उत्पन्नाचे इतर वितरण देखील एकूण परतावे काढताना भांडवलाच्या अधिमूल्यनात मिळवले जाते.
म्युच्युअल फंड्स मधील भांडवलाचे अधिमूल्यन हे काळानुसार एनएव्ही मध्ये होणाऱ्या वाढीमध्ये प्रतिबिंबित होते. हे असे होते कारण एखाद्या फंडची एनएव्ही ही पोर्टफोलिओ मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या स्टॉकच्या किमतीवरून ठरवली जाते आणि किंमत ही रोज बदलत असते. काळानुसार एखाद्या फंडच्या एनएव्ही मधील बदल हे भांडवलाच्या अधिमूल्यनामध्ये किंवा आपली धारणक्षमता कमी होण्यामध्ये सहभागी असतात. आपल्या फंड हाऊसने दिलेल्या अकाऊंट स्टेटमेंट मध्ये आपल्या गुंतवणुकीच्या परताव्यांची कामगिरी बघा. हे स्टेटमेंट आपल्या गुंतवणुकीमधील व्यवहार आणि परतावे दोन्ही एकत्रितपणे दाखवते.
नोट: *एखाद्या फंडची एनएव्ही ही डिव्हीडंट पेआउटच्या आणि काही वैधानिक आकारणी असल्यास, त्यांच्या मर्यादेपर्यंत येते.