म्युच्युअल फंड्सचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत?

Video

वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी असतात. हे मुख्यत्वे तीन प्रकारचे असतात.

  1. इक्विटी किंवा ग्रोथ फंड्स

  • हे प्रामुख्याने इक्विटीज मध्ये म्हणजेच कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात.
  • यांचे प्राथमिक उद्दिष्ट संपत्ती निर्माण करणे किंवा भांडवलाचे अधिमूल्यन करणे हे असते.
  • त्यांच्यामध्ये मोठे परतावे मिळवण्याची क्षमता असते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते सर्वोत्तम असतात.
  • याची उदाहरणे म्हणजे
  • “लार्ज कॅप” फंड्स जे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुस्थापित असतो.
  • “मिड कॅप” फंड्स जे मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
  • “स्मॉल कॅप” फंड्स हे लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
  • “मल्टी कॅप" फंड्स जे मोठ्या, मध्यम आणि लहान अशा मिश्र कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
  • “सेक्टर" फंड्स हे एकाच प्रकारचा व्यवसाय असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. उदा. तंत्रज्ञान फंड्स हे तंत्रज्ञान विषयक कंपन्यांमध्येच गुंतवणूक करतात. 
  • “थेमॅटिक” फंड्स जे एका सामाईक थीम मध्येच गुंतवणूक करतात. उदा. इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स जे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांना पायाभूत सुविधा विभागाच्या गुंतवणुकीतून लाभ होतो.
  • टॅक्स सेविंग फंडस्
  1. इन्कम किंवा बाँड किंवा फिक्स्ड इन्कम फंड्स

  • जे फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज, जसे की, सरकारी सिक्युरिटीज किंवा बाँड्स, कमर्शियल पेपर्स आणि डिबेंचर्स, बँक सर्टिफिकेट्स किंवा डीपॉझीट्स आणि ट्रेजरी बिल्स, कमर्शियल पेपर्स सारखी मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स इ. मध्ये गुंतवणूक करतात.
  • ह्या तुलनेने सुरक्षित गुंतवणुक आहेत आणि या उत्पन्न निर्मितीसाठी सोयीस्कर आहेत.
  • याची उदाहरणे म्हणजे लिक्विड, कमी कालावधी, बदलता दर,  कॉर्पोरेट डेब्ट, डायनॅमिक बाँड, गिल्ट फंड्स इ.
  1. हायब्रीड फंड्स

  • हे इक्विटी आणि फिक्स्ड इन्कम दोन्ही प्रकारच्या फंड्स मध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे ते दोन्हींमधले सर्वोत्तम म्हणजेच विकासाची क्षमता आणि त्याचबरोबर उत्पन्न निर्मिती दोन्ही देतात. 
  • उदा. अग्रेसीव्ह बॅलन्स्ड फंड्स, कॉन्झर्व्हेटिव्ह बॅलन्स्ड फंड्स, पेन्शन फंड्स, चाईल्ड प्लॅन्स आणि मासिक उत्पन्न योजना इ.
453

म्युच्युअल फंड सही आहे?