म्युच्युअल फंड्समध्ये दररोज गुंतवणूक करायला हवी का?

म्युच्युअल फंड्समध्ये दररोज गुंतवणूक करायला हवी का? zoom-icon

आपण सर्वांनी कासव आणि सशाची गोष्ट ऐकलेली आहे - सावकाश, पण निश्चितपणे काम करणारा शर्यत जिंकतो. हा धडा जीवनाच्या सर्व परिस्थितींमध्ये उपयोगी पडतो, गुंतवणुकीसाठी सुद्धा. अशा परिस्थितीमध्ये सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) लोकप्रिय होत असल्या तर त्यात नवल ते काय. संपत्ती निर्मितीसाठी नियमितपणे बचत आणि गुंतवणूक करण्यासाठी एसआयपी हा उत्तम मार्ग आहे. 

संपत्ती निर्मितीसाठी आपण गुंतवू इच्छित असलेल्या रकमेसाठी आपण दर आठवड्याला, दर महिन्याला आणि दर तीन महिन्याने (क्वार्टर) एसआयपी निवडू शकता. काही फंड्स हाऊसनी दैनिक एसआयपी सुद्धा सुरू केली आहे. पण अधिक लोकप्रिय असलेल्या मासिक एसआयपी पेक्षा दैनिक एसआयपी संपत्ती निर्मिती साठी अधिक उपयोगी आहे का? एसआयपीचा वापर दीर्घकालीन उद्दिष्टांच्या नियोजनासाठी केला जातो, म्हणून 10-15 वर्षांच्या कालावधीमध्ये याचा फारसा फरक पडणार नाही, पण लहान कालावधीसाठी मिळणा-या परिणामावर फरक पडण्याची शक्यता आहे. दैनिक एसआयपीमुळे आपले व्यवहार महिन्यातून एक होण्याऐवजी महिन्यातून वीस वेळा होतात आणि त्यांवर लक्ष ठेवणे कठीण ठरु शकते. जर आतासुद्धा आपल्याला प्रश्न पडला असेल, की "मी माझा पैसा कसा गुंतवू"? तर मसिक एसआयपी हाच योग्य मार्ग आहे.

453

म्युच्युअल फंड सही आहे?