विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर

तुमची गुंतवणूक पुढे ढकलण्याचा विचार करत आहात?
तुमचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मिळकतीवर होणार्‍या परिणामांचा विचार करा.

  आजच गुंतवणूक करा नंतर गुंतवणूक करा
वर्षे
वर्षे
10%
SIP ची अंतिम मुदत
वर्षे
वर्षे
गुंतवणूकीची एकुण वर्षे 10 वर्षे 5 वर्षे
गुंतवणूकीची एकुण रक्कम ₹ 1.20 लाख ₹ 60,000
तुमच्या गुंतवणुकीची अंतिम किंमत ₹ 2.05 लाख ₹ 77,437
संपत्ती बनवणे ₹ 84,845 ₹ 17,437
विलंब रक्कम  
₹ 1.27 लाख
  आजच गुंतवणूक करा नंतर गुंतवणूक करा
वर्षे
वर्षे
10%
पैसे काढते वेळी असणारे वय
वर्षे
वर्षे
गुंतवणूकीची एकुण वर्षे 10 वर्षे 5 वर्षे
गुंतवणूकीची एकुण रक्कम ₹ 1 लाख ₹ 1 लाख
तुमच्या गुंतवणुकीची अंतिम किंमत ₹ 2.59 लाख ₹ 1.61 लाख
संपत्ती बनवणे ₹ 1.59 लाख ₹ 61,051
विलंब रक्कम  
₹ 98,323

डिस्क्लेमर :

भूतकाळातील कामगिरी प्रमाणे भविष्यातील कामगिरी असेल किंवा नसेल आणि ती भविष्यातील परताव्याची हमी देत नाही.
कृपया लक्षात ठेवा, हा कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहे आणि प्रत्यक्ष मिळकत दर्शवत नाही.
म्युच्युअल फंडांच्या परताव्याचा निश्चित दर नसतो आणि परताव्याच्या दराचा अंदाज देखील बांधता येत नाही. *येथे दर्शविलेल्या मूल्यावर महागाईचा होणारा परिणाम विचारात घेतला जात नाही

विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) म्हणजे काय?

विलंब किंमत म्हणजे गुंतवणूक काही वर्षे पुढे ढकलल्याने लागणारी अतिरिक्त रक्कम.

विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर, तुम्हाला तुमच्या सिस्टमैटिक गुंतवणुकीला विशिष्ट कालावधीपर्यंत उशीर केल्याचे परिणाम समजावून सांगण्यासाठी मदत करतो. तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू करण्यास उशीर केल्यास तुमचे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेले अतिरिक्त रक्कम जाणून घेण्यास तो तुम्हाला मदत करतो.
हा कॅल्क्युलेटर हे दाखवतो की, गुंतवणुकीचा लहानसा विलंबदेखील दीर्घकालीन गुंतवणुकीवर मोठा परिणाम करु शकतो, म्हणूनच गुंतवणूक ताबडतोब सुरू करणे आर्थिक यशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

लोक गुंतवणूक लांबणीवर का टाकतात?

गुंतवणूक लांबणीवर टाकण्यासाठी कारण ठरणारे मुख्य घटक असतात :

  • अपुरे आर्थिक ज्ञान
  • स्पष्ट उद्दिष्टे आणि नियोजन नसणे
  • कामे पुढे ढकलण्याची सवय
  • अनावश्यक खर्चाच्या सवयी
  • जोखीम घेण्याची भीती

गुंतवणुक लांबणीवर टाकल्याचे लक्षणीय परिणाम होऊ शकतात :

  • बाजारात गमावलेल्या वेळेमुळे दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी अपुरा निधी
  • तुमच्या पैशाची खरेदीची शक्ती कमकूवत होणे
  • तुम्ही चक्रवाढीच्या शक्तीचा वापर करण्यास मुकू शकता.

विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर कधी वापरावा?

गुंतवणूक लांबणीवर टाकण्याचा विचार करताना कॉस्ट ऑफ डिले कॅल्क्युलेटर वापरण्याचा विचार करा. या विलंबामुळे गुंतवणुकीच्या आवश्यक रकमेत किती फरक पडतो ते पाहण्यास हा मदत करतो, ज्यामुळे तुम्ही तत्काळ गुंतवणूक करण्याचा पर्याय आणि गुंतवणूक लांबणीवर टाकण्याचा पर्याय यांची तुलना करू शकता आणि प्रत्यक्ष आकडे पाहून समंजसपणे निर्णय घेऊ शकता.

विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर वापरण्याचे फायदे

  • ठराविक वेळेसाठी असलेल्या संधींचे मूल्यांकन करा: ठराविक वेळेसाठी असणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये लगेच गुंतवणूक करणे किंवा विलंब करणे आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे का ते ठरवा.
  • दीर्घकालीन वृद्धीचे विश्लेषण करा: नियमित गुंतवणूक लांबणीवर टाकल्याने वृद्धीचे आणि चक्रवाढीचे फायदे संभाव्यत: किती गमवाल ते पाहा.
  • गुंतवणुकीच्या पर्यायांची तुलना करा: वेगवेगळ्या कालमर्यादांसाठी किंवा संभाव्य उत्पन्न मिळवण्यासाठी विविध पर्यायांमधील गुंतवणुक लांबणीवर टाकण्याची किंमत पहा आणि त्याची तुलना करा.

विलंब किंमत (कॉस्ट ऑफ डिले) कॅल्क्युलेटर कसा काम करतो?

हा कॅल्क्युलेटर आधी ठरवलेल्या फॉर्म्युलाच्या (सूत्राच्या) आधारे काम करतो. तो बाजारातील चढउतार किंवा उत्पन्नावर बाहेरून प्रभाव टाकणारे घटक विचारात घेत नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्र. 1 गुंतवणुकीस उशीर केल्याच्या किंमतीचा कॅल्क्युलेटर गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यास मदत कसा करतो?

उत्तर. गुंतवणुकीस उशीर केल्याच्या किंमतीचा कॅल्क्युलेटर माहिती प्राप्त निर्णय घेण्यास मदत करतो. गुंतवणुका लांबणीवर टाकण्याचे परिणाम तो उदाहरणातून दाखवून देतो. त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक सुरु करण्याची परिपूर्ण वेळ ठरवण्यास आणि तुमच्या आर्थिक उद्दीष्टांच्या दिशेने काम सुरु करण्यास मदत होते.

प्र. 2 गुंतवणुकीस उशीर केल्याची किंमत कॅल्क्युलेट करणे का आवश्यक असते?

उत्तर. गुंतवणुकीस उशीर केल्याची कॅल्क्युलेट केल्याने तुम्हाला लवकर गुंतवणूक करण्याचे महत्त्व समजण्यास आणि ती लांबणीवर टाकण्याची संभाव्य किंमत समजण्यास मदत होते.

प्र. 3 गुंतवणुकीस उशीर केल्याच्या किंमतीचा कॅल्क्युलेटर कोणते घटक विचारात घेतो?

उत्तर. कॅल्क्युलेटर सहसा तुम्हाला किती रक्कम गुंतवायची आहे, किती काळ गुंतवायची आहे, अपेक्षित उत्पन्न किती आहे आणि गुंतवणूक किती काळ लांबणीवर टाकायची आहे, या गोष्टी विचारात घेतो.

प्र. 4 गुंतवणुकीस उशीर केल्याबदद्ल त्या किंमती संदर्भात कॅल्क्युलेटरचे निष्कर्ष नेमके असल्याची हमी आहे का?

उत्तर. परिणाम काही पूर्वकल्पनांवर आधारित अंदाज आहेत आणि भविष्यातील परिणामांसाठी हमी म्हणून नव्हे तर मार्गदर्शक म्हणून वापरले पाहिजेत.

डिस्क्लेमर:

1. कृपया नोंद घ्या की हे कॅल्क्युलेटर केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते प्रत्यक्ष परतावे दर्शवत नाहीत.

2. म्युचुअल फंड्‌सवर नियत मिळकतीचा दर(फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न) मिळत नाही आणि मिळकतीच्या दराचे(रेट ऑफ रिटर्न) अनुमान लावणे अशक्य असते.

3. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.