र्ई्टीएफ अशी अक्रिय गुंतवणुकीची साधने आहेत जी त्यांच्या अंतर्गत असलेल्या एखाद्या इंडेक्सचा पाठपुरावा करतात आणि शेअर्सप्रमाणेच एक्सचेंज वर विनिमयकरतात. परंतु ईटीएफ फक्त एखाद्या ब्रोकरच्या माध्यमातून एक्सचेंज वर खरेदी केले किंवा विकले जाऊ शकतात. ईटीएफ मध्ये ट्रेड करण्यासाठी आपले डीमॅट खाते असणे गरजेचे आहे आणि प्रत्येक व्यवहारासाठी आपल्याला ब्रोकरला कमिशन द्यावे लागते. जर आपल्याला दिवसभरात केव्हाही ट्रेडिंग करण्याचा फायदा घेण्यासाठी ईटीएफ आकर्षक वाटत आहेत, तर लक्षात घ्या की कमिशनच्या खर्चामुळे आपला परतावा कमी होत असतो.
दुसरे म्हणजे, म्युच्युअल फंड मध्ये ज्याप्रमाणे एसआयपी द्वारे किमतीची सरासरी काढणे उपलब्ध आहे ते लाभ ईटीएफ आपल्याला देऊ शकत नाहीत. जर आपल्याला ईटीएफ मध्ये नियमित गुंतवणूक करायची असेल, तर आपल्याला प्रत्येक व्यवहाराच्या वेळी कमिशन द्यावे लागेल. ईटीएफमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या वित्तीय उद्दिष्टांसाठी जे योग्य आहे त्याप्रमाणे ग्रोथ किंवा लाभांश(डिव्हिडंड) पर्याय निवडण्याची मुभा नसते. उदाहरणार्थ, एखाद्या निवृत्त झालेल्या गुंतवणूकदाराला नियमित उत्पन्नाची गरज, तसेच नियमित लाभांश(डिव्हिडंड) मिळवण्याची गरज ईटीएफ द्वारे पूर्ण केली जाऊ शकत नाही.
काही ईटीएफ अत्यंत सोयीचे किंवा ठराविक विभागाशी निगडीत असतात आणि त्यांचे ट्रेडिंग फार होत नाही. गुंतवणूकदारांना ईटीएफ मध्ये व्यवहार करताना खूप अधिक बिड/ आस्क स्प्रेडचा (ईटीएफची सध्याची किंमत आणि त्याचा एनएव्ही यामधील फरक) सामना करावा लागू शकतो. ईटीएफ दिवस भरातून केव्हाही ट्रेड करण्याची संधी देत असल्यामुळे अल्प कालावधीसाठी आकर्षक वाटू शकतात, पण एखाद्या दीर्घकालीन वित्तीय योजनेसाठी ते कुचकामी ठरू शकतात.