ईटीएफ मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?

ईटीएफ मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?

एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) अनेक बाबतीत सामान्य म्युच्युअल फंड्स पेक्षा अधिक चांगले आहेत. ज्यांना म्युच्युअल फंड मध्ये पैसे गमावण्याची काळजी वाटते अशा पहिल्यांदा इक्विटी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हे उत्तम साधन आहे. याचे कारण काय?

ईटीएफ एका लोकप्रिय इंडेक्सचे अनुकरण करतात, त्या इंडेक्स मधील सर्व सिक्युरिटीज त्यांत असतात आणि त्यांत म्युच्युअल फंडपेक्षा अधिक वैविध्य असते.

• अनुकरण करण्याच्या या नीति मुळे (अक्रिय फंड व्यवस्थापन) सक्रिय व्यवस्थापन केलेले फंड, जे त्यांच्या मापदंडापेक्षा अधिक परतावा दाखवण्यासाठी आपल्या पोर्टफोलिओ मधील सिक्युरिटीज अनेक वेळा खरेदी किंवा विक्री करतात त्यांच्यापेक्षा यांचे खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी होतात. सक्रिय व्यवस्थापन केलेल्या फंडमधील या व्यवहारांमुळे अधिक कर आकारणी होते कारण फंडला त्यांच्या पोर्टफोलिओ मधील सिक्युरिटीज विकताना किंवा खरेदी करताना एसटीटी (सिक्युरिटीज ट्रांझॅक्शन टॅक्स) आणि कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे इतर म्युच्युअल फंडपेक्षा ईटीएफ करांच्या बाबतीत अधिक कार्यकुशल आहेत.

• सक्रिय व्यवस्थापन केलेल्या फंडच्या तुलनेत ईटीएफचा खर्चांचे गुणोत्तर (एक्सपेंस रेशो) कमी असते कारण सक्रिय व्यवस्थापन केलेल्या फंड्सना अधिक कुशल फंड व्यवस्थापक नेमावे लागतात जेणेकरुन त्यांच्या बेंचमार्क इंडेक्सपेक्षा अधिक परतावा मिळू शकेल. 

• एक्सचेंजवर लिस्टेड असून स्टॉक प्रमाणे ट्रेडिंग होत असल्यामुळे ईटीएफ गुंतवणूकदारांना अधिक लिक्विडिटी आणि सोय उपलब्ध करून देतात. गुंतवणूकदार ईटीएफ फंड मध्ये बाजाराच्या वेळेमध्ये लगेच व्यवहार करू शकतात, तर सक्रिय व्यवस्थापन केलेल्या फंडच्या एनएव्हीची गणना बाजाराची वेळ संपल्यावर एकदाच केली जाते.

जर आपल्याला इक्विटी गुंतवणुकींबद्दल काही शंका असतील, तर आपण ईटीएफ ही आपली सुरूवात आहे!

454