गुंतवणुकीचा विचार करताना लोकांची आर्थिक उद्दिष्टे आणि रिस्क घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. गुंतवणुकीची निवड तुमच्या दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टांवर अवलंबून असते. हे घटक तुमच्या गुंतवणूकीच्या निवडी आणि दृष्टिकोनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. रिस्क-ओ-मीटर हे एक साधन म्हणून काम करते जे सोयीस्कर योजना निवडण्यात मदत करते.
नवीन रिस्क-ओ-मीटर समजून घेणे
रिस्क ग्रेडिंग अप्रोच हा रिस्क-ओ-मीटरचा नवीन पैलू. पूर्वीच्या रिस्क-ओ-मीटरच्या विपरीत, जे फक्त वेगवेगळ्या रिस्क ग्रेड सह फंड कैटेगरिनां जोडत होते, नवीन रिस्क-ओ-मीटर फंडातील विशिष्ट मालमत्तेवर त्याचे रिस्क मूल्यांकन आधारित आहे. नवीन रिस्क-ओ-मीटर फंडामध्ये उपस्थित विशिष्ट असेट्स द्वारे तुमच्या जोखमीचे मूल्यांकन करतात. याचा अर्थ असा होतो की विशिष्ट फंड योजनेला दिलेला रिस्क ग्रेड त्या योजनेच्या मुख्य असेट्स आणि त्यांच्या एकाग्रतेवर अवलंबून असते. हा बदल रिस्क मूल्यांकनला अधिक वास्तविक अनुभव देतो कारण तो फंडाच्या असेट्सशी संबंधित वास्तविक रिस्क विचारात घेतो.
सोयीस्कर म्युच्युअल फंड योजना निवडणे
तुमची गुंतवणुकीची उद्दिष्टे, रिस्क घेण्याची क्षमता आणि वेळ मर्यादा लक्षात घेऊन, रिस्क-ओ-मीटरचे रीडिंग तुमच्या निकषांशी उत्तम प्रकारे जुळणारी गुंतवणूक ओळखते.
उदाहरणार्थ, कमी रिस्क असलेले म्युच्युअल फंड जसे की ओव्हरनाईट आणि आर्बिट्राज फंड अशा गुंतवणूकदारांसाठी योग्य असू शकतात जे अल्प मुदतीसाठी कमीत कमी जोखमीसह भांडवली संरक्षणाला प्राधान्य देतात.
दुसरीकडे, दीर्घ मुदतीत जास्तीत जास्त परतावा शोधणारे गुंतवणूकदार, जरी त्यांचे भांडवल धोक्यात घालायचे असले तरीही, 'अति उच्च' रिस्क ग्रेडमध्ये मोडणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांशी चांगले अनुकूल होतात.
अधिक माहितीसाठी, डाव्या बाजूला दिलेल्या तक्त्याचा संदर्भ घ्या.
प्रत्येक श्रेणीमध्ये उपलब्ध असलेल्या विशिष्ट योजनांचे कसून आणि काळजीपूर्वक मूल्यमापन करणे सुध्या तेवढेच महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, समान रिस्क कैटेगरीमध्ये असलेले सर्व फंड एकसारखे नसतात. त्यांच्याकडे वेगवेगळी धोरणे, होल्डिंग्ज आणि संभाव्य परिणाम असू शकतात. त्यामुळे, योग्य अभ्यास करून तुमच्या आर्थिक उद्दिष्टांशी आणि रिस्क घेण्याच्या क्षमेतेप्रमाणे उत्तम जुळणारी गुंतवणूक योजना निवडण्याचा नेहमी सल्ला दिला जातो. तुम्हाला मदत हवी असल्यास, आर्थिक तज्ञाची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका.
डिस्क्लेमर
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.