गुंतवणूक हा आपले आर्थिक/फायनांशीअल भवितव्य सुरक्षित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग असूनही अनेकजण गुंतवणूक उशिरा सुरु करतात. पहिल्यांदाच नोकरीला लागलेले तरुण भविष्याचे नियोजन करण्याऐवजी आधी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करताना जास्त आढळून येतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ते आयुष्याचे नंतरचे टप्पे येईपर्यंत गुंतवणूक करणे सुरु करत नाहीत.
गुंतवणूक सुरु करण्यास खरा उशीर कधीच होत नसतो, पण तरी लवकर गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. त्याखेरीज, आयुष्यात लवकर गुंतवणूक केल्याने तरुण गुंतवणूकदारांना जास्त बचत करता येते कारण त्यांच्या प्रोफ़ेशनल लाईफच्या सुरुवातीला त्यांच्याकडे खूप कमी जबाबदाऱ्या असतात.
चला पाहूया, तरुण वयात गुंतवणूक सुरु करण्याची पाच मुख्य कारणे:
- चक्रवाढीच्या शक्तीचा लाभ घ्या
लवकर गुंतवणूक करण्याचा सर्वांत मोठा फायदा असतो की तुमच्या हातात जास्त वेळ असतो. चक्रवाढीच्या साहाय्याने, तुमची गुंतवणूक कालांतराने वाढण्याची शक्यता जास्त चांगली असते. तुमचे उत्पन्न चक्रवाढीने वाढते, तेव्हा तुमच्या गुंतवणुकांवर मिळणारे व्याजही अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पुन्हा गुंतवले जाते.
चला एक उदाहरण पाहूया:
असे समजा की तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी, तुमचा पहिला पगार मिळाल्यावर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करण्याची योजना सुरु केलीत. तुम्ही रु. 1000 ची एसआयपी रक्कम ठेवून दरवर्षी 10% सरासरी दर देणारी गुंतवणूक सुरु केलीत.
तुमचं वय |
असताना तुमचा गुंतवणुकीचा काळ असेल |
गुंतवलेली रक्कम (रु) |
कमावलेली एकूण रक्कम (रु) |
35 |
10 वर्षे |
1.2 लाख |
2.05 लाख |
45 |
20 वर्षे |
2.4 लाख |
7.59 लाख |
55 |
30 वर्षे |
3.6 लाख |
22.6 लाख |
60 |
35 वर्षे |
4.2 लाख |
37.97 लाख |
*हे फक्त एक उदाहरण आहे. या तक्त्यामध्ये दाखविलेले परतावे हे पूर्णपणे काल्पनिक आहेत आणि फक्त स्पष्टीकरण करण्यासाठी दिलेले आहेत. म्युच्युअल फंड्स परताव्याच्या कोणताही आश्वासित दर देत नाहीत.
तुमच्या लक्षात आले असेल, की फक्त रु. 1000 ची नियमित गुंतवणूक केल्यानेही तुम्ही कालांतराने भरपूर संपत्ती बनवू शकता.
इथे हे लक्षात घ्यायला हवे की चक्रवाढीची शक्ती लम्प-सम गुंतवणुकांनाही लागू होते.
- तुमची जोखीम घेण्याची क्षमता सुधारते
जोखीम/रिस्क आणि मोबदला/रिवॉर्ड ह्यांचा नक्कीच थेट संबंध असतो. दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने तुम्हाला तुमच्या जोखमीचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. तुम्ही तरुण असताना तुमच्याकडे जोखीम/रिस्की असलेल्या मार्गांमध्ये गुंतवणूक करण्याचा आणि तुमचे वय वाढत जाईल तसे तुमची जोखीम कमी करत नेण्याचा पर्याय असतो. तुमचे वय वाढते, तसे जास्त रिस्क घेणे कठीण होत जाते कारण तुमच्या जबाबदाऱ्या वाढत जातात उदा. ईएमआय, मुलांचे शिक्षण, गहाण संपदा, इ. लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला रिस्क कमी करून कोणताही आर्थिक तणाव सहन करावा न लागता संपत्ती बनवता येते.
- तोट्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते
तुम्ही लवकर सुरुवात करता तेव्हा तुमच्या हातात वेळ असतो. नुकसान हे पूर्ण माहिती न घेतलेल्या निर्णयामुळे किंवा बाजारातील अस्थिरतेमुळे झालेले असू शकते. आवश्यक असल्यास तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा दृष्टिकोनाचा आढावा घेऊन तोट्याचे अधिक चांगल्या पध्दतीने व्यवस्थापन करू शकता. उदाहरणार्थ, बाजारातील अस्थिरतेच्या बाबतीत, तो म्युच्युअल फंडांमधील एसआयपीच्या मदतीने व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही अधिक सिध्द असू शकाल. तुम्ही जेव्हा एसआयपी मार्फत म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करता, तेव्हा तुम्ही बाजार घसरलेला असताना जास्त युनिट खरेदी करून आणि बाजार वाढलेला असताना कमी युनिट्स खरेदी करून तुमच्या गुंतवणुकीचा खर्च सरासरीने कमी करत असता. ह्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात. तुम्ही लवकर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर रुपयाच्या किमतीच्या सरासरी करणामुळे तुम्हाला तुमचे नुकसान अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत होऊ शकते.
- माहितीप्राप्त निर्णय घ्या
तुमच्या हातात जास्त वेळ असतो, तेव्हा तुम्ही गुंतवणुकीचे विविध पर्याय पडताळू शकता आणि आवश्यकतेनुसार तुमच्या पोर्टफोलिओचा समतोलही पूर्ववत करू शकता, ज्यामुळे तुमच्या गुंतवणुकांना रिस्क कमी करण्यास आणि तुम्हाला मिळणारे उत्पन्न वाढवण्यास वेळ मिळतो. त्याखेरीज, लवकर गुंतवणूक केल्याने तुम्हाला बाजारातील हालचाली समजून घेण्यास मदत मिळते ज्यामुळे चाचणी आणि सुधारणा करण्यास जास्त वेळ मिळतो आणि आयुष्यात नंतर गुंतवणूक करताना तुम्हाला ताण आणि भीतीसुद्धा कमी वाटते.
- लवकर निवृत्त होण्याचे ध्येय पूर्ण करा
तुम्ही आधीपासून आणि योग्य मार्गांनी गुंतवणूक करत राहिलात तर तुमचे निवृत्त होण्याचे ध्येय लवकर पूर्ण करणे शक्य होईल.
समजा तुम्हाला लवकर निवृत्त होण्यासाठी रु. 1 कोटी कमवायचे आहेत.
तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केलीत |
वयाच्या ३५ व्या वर्षी गुंतवण्यास सुरुवात केली तर |
||
एसआयपी रक्कम (रु) |
10,100 |
एसआयपी रक्कम (रु) |
10,100 |
मिळकतीचा गृहीत दर |
12% |
मिळकतीचा गृहीत दर |
12% |
गुंतवणुकीची रक्कम (रु) |
24.24 लाख |
गुंतवणुकीची रक्कम (रु) |
12.12 लाख |
45 वर्षे वयात जमलेली रक्कम (रु) |
1 कोटी |
45 वर्षे वयात जमलेली रक्कम (रु) |
23.5 लाख |
*हे फक्त एक उदाहरण आहे. या तक्त्यामध्ये दाखविलेले परतावे हे पूर्णपणे काल्पनिक आहेत आणि फक्त स्पष्टीकरण करण्यासाठी दिलेले आहेत. म्युच्युअल फंड्स परताव्याच्या कोणताही आश्वासित दर देत नाहीत.
वरील उदाहरणात दाखवल्याप्रमाणे, लवकर गुंतवणूक सुरु केल्याने तुम्हाला तुमचे लक्ष्य वेगाने गाठण्यास मदत होईल आणि कदाचित तुम्हाला लवकर निवृत्तही होता येईल (किंवा इतर कोणतेही ध्येय साध्य करता येईल).
निष्कर्ष
गुंतवणुक लवकर करू लागण्याचे अनेक फायदे असतात. तरुणपणी गुंतवणूक करताना तुम्ही बाजाराला दिलेल्या वेळेचा फायदा घेऊ शकता, ज्यामुळे जोखमीचे व्यवस्थापन करण्यास आणि आपात्कालीन निधी उभा करण्यास मदत होते आणि त्याच वेळी तुमची आर्थिक ध्येये वेगाने साध्य करता येतात. अशाप्रकारे, जर तुम्ही तुमच्या गुंतवणुका वाढवण्याची शक्यता वाढवलीत, तर तरुणपणी गुंतवणूक करायला घेणे पूर्णपणे योग्य ठरते.
अस्वीकरण:
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.