तुमच्या उत्पन्नावर, वैयक्तिक जीवनाच्या टप्प्यावर, आणि मासिक खर्चातील बदलांवर अवलंबून तुम्ही किती गुंतवणूक करू शकता, हे ठरते. महागाईला सामोरे जाण्यासाठी आणि तुमच्या उद्दिष्टांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी, तुमच्या गुंतवणुकीचं वाढणं महत्त्वाचं आहे.
सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा टॅक्स बचतीसाठीच्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग आहे. SIPच्या मदतीने, तुम्ही तुमच्या बजेटला योग्य अशी छोटी रक्कम नियमितपणे गुंतवू शकता, मग ती आठवड्याला, महिन्याला किंवा तिमाहीला असो. तुमची गुंतवणूक अधिक प्रभावी बनवण्यासाठी, तुम्ही एक ऑटोमेटेड फीचर वापरू शकता, ज्यामुळे तुमची गुंतवणूक ठराविक कालावधीत वाढेल.
तुम्ही हे स्टेप-अप SIPच्या मदतीने करू शकता.
स्टेप-अप सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP): एक स्टेप-अप SIP आपल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीची रक्कम ठराविक टक्क्यांनी आपोआप वाढवते. तुमच्या करिअरच्या सुरुवातीला स्टेप-अप SIP सुरु करा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तयारी करा.