गुंतवणूकदारांना एकाच ठिकाणी एखाद्या स्किमबद्दल विस्तृत माहिती मिळवण्यासाठी फॅक्टशीट सर्वात विश्वसनीय मार्गदर्शिका असते. आपण पाहिले आहे का, की एखाद्या विद्यार्थ्याचे मासिक प्रगतीपत्रक कसे दिसते? यात विद्यार्थ्याचे फक्त शालेय प्रदर्शनच दिलेले नसते, तर त्याचा व्यवहार, इतर गतिविधींमध्ये त्याचा सहभाग, उपस्थिती, अनुशासन अशी इतर महत्त्वाची माहिती दिलेली असते जी आपल्याला माहीत असणे गरजेचे असते. या प्रगतीपत्रकामध्ये त्याच्या वर्गाच्या सरासरीच्या तुलनेत त्या मुलाचे प्रदर्शन कसे आहे ते सुद्धा दिलेले असते.
एखाद्या फंडची फॅक्टशीट तशीच असते. यात आपल्या फंडच्या प्रत्येक पैलूबद्दल महत्त्वाची माहिती असते जी प्रत्येक वर्तमान किंवा भावी गुंतवणूकदाराला माहीत असायला हवी, जसे गुंतवणुकीचे उद्दिष्ट, बेंचमार्क, एयूएम(AUM), फंड व्यवस्थापक, उपलब्ध पर्याय, गुंतवणुकीची किमान रक्कम, निर्गमन भार(एग्ज़िट लोड) आणि निरनिराळ्या स्किमचे एनएव्ही. फॅक्टशीटमध्ये प्रदर्शन आणि जोखीम बद्दल महत्त्वाचे आकडे असतात जसे प्रमाण विचलन (चढ-उताराचे माप), बीटा, शार्प रेशो, निरनिराळ्या स्किमचा खर्चाचा अनुपात आणि इक्विटी फंड्ससाठी पोर्टफोलिओ टर्नओव्हर आणि डेब्ट फंड्स साठी कालावधी, सरासरी मैच्योरिटी आणि पोर्टफोलिओचा परतावा. फॅक्टशीटमध्ये सर्व सेक्टर आणि सिक्योरिटीज प्रमाणे गेल्या महिन्यातील पोर्टफोलिओ होल्डिंग सुद्धा दर्शवली जाते.
यात बेंचमार्कच्या तुलनेत फंडच्या प्रदर्शनाचा इतिहास असतो आणि फंडचे जोखीम-स्तर सुद्धा दर्शवले जाते. थोडक्यात, फॅक्टशीटमध्ये ती सर्व महत्त्वाची माहिती असते जी एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याकडे असली पाहिजे.