म्युच्युअल फंड गुंतवणूक सुरू करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता?

Video

ज्याप्रमाणे एखादे बँक खाते उघडण्यासाठी सुरुवातीला काही कागदी कामे करावी लागतात आणि त्यानंतर आपले सर्व व्यवहार सुरळीत होतात, म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे सुद्धा तसेच आहे. आपला म्युच्युअल फंडचा प्रवास सुरू करण्यासाठी अगदी प्राथमिक गरज म्हणेज काही गरजेची कागदपत्रे तपासणीसाठी जमा करून आपले केव्हायसी पूर्ण करून घेणे. एकदा केव्हायसी पूर्ण झाल्यावर आपण कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये कितीही रकमेसाठी आणि कुठल्याही कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. 

केव्हायसी एकदाच करायची प्रक्रिया आहे ज्यात म्युच्युअल फंडच्या जगाच्या दाराची किल्ली आहे. यामुळे कुठल्याही म्युच्युअल फंडमध्ये आपला शिरकाव सहज होतो आणि एकदा केव्हायसी तपासणी पूर्ण झाल्यावर आपण आपल्या घरी बसूनसुद्धा सर्व कामे करू शकता. आजकाल तर आपण ई-केव्हायसी द्वारे संपूर्ण पणे ऑनलाइन सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. पण ई-केव्हायसी केल्यावर आपण प्रत्येक फंड हाउसमध्ये दर वर्षी फक्त रु. 50,000/- एवढीच गुंतवणूक करू शकता. 

केव्हायसी तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपण कुठल्याही म्युच्युअल फंडमधमये एखाद्या वितरकाच्या माध्यमाने किंवा थेट सुद्धा सहज गुंतवणूक करू शकता. पैसे काढण्यासाठी आपण केव्हाही म्युच्युअल फंड कंपनीकडे भरपाईसाठी अर्ज करू शकता आणि 3-4 कार्य दिवसांमध्ये आपले पैसे आपल्या बँक खात्यामध्ये येतात. खरे तर, पण एसआयपी किंवा एकरकमी गुतंवणूक करणे, एका स्कीममधून दुसऱ्या स्कीममध्ये स्विच करणे किंवा स्कीम विकणे अशी बरीचशी कामे आपल्या घरूनच ऑनलाइन सुद्धा करू शकता.

454