जर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करता येते, तर गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी?

जर गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करता येते, तर गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी? zoom-icon

गोल्ड ईटीएफ फंड हा एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) असतो, ज्यात देशातील सोन्याच्या भावावर लक्ष ठेवले जाते. ही सोन्याच्या भावावर आधारलेली गुंतवणुकीची निष्क्रिय उपकरणे आहेत जी गोल्ड बुलियनमध्ये गुंतवणूक करतात. भारतात सोने साधारणपणे दागिन्यांच्या स्वरूपात असते, ज्यात घडणावळ आणि घट या घटकांचा सुद्धा समावेश असतो (साधारणपणे बिलाच्या रकमेच्या 10% पेक्षा अधिक). गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक केल्याने या अडचणी येत नाहीत.

गोल्ड ईटीएफ विकत घेतल्याचा अर्थ असा होतो की आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोने विकत घेत आहात. आपण स्टॉक ट्रेडिंग करतो त्याचप्रमाणे गोल्ड ईटीएफची खरेदी आणि विक्री करू शकता. जेव्हा आपण गोल्ड ईटीएफच्या रक्कम काढून घेण्याचा अर्ज करता, तेव्हा आपल्याला सोने मिळत नाही, तर त्याप्रमाणात रोख रक्कम मिळते. गोल्ड ईटीएफचे व्यवहार एका डीमॅट खात्याद्वारे ब्रोकरमार्फत केले जातात, त्यामुळे हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा फारच सोयीचा मार्ग आहे.

गोल्ड ईटीएफच्या किमतीचा संबंध थेट सोन्याच्या किमतीशी असतो, त्यामुळे यातील मालमत्ता संपूर्णपणे पारदर्शक स्वरूपाची असते. तसेच, याच्या विलक्षण संरचनेमुळे आणि निर्मितीच्या प्रक्रियेमुळे, ईटीएफ साठी इतर खर्च प्रत्यक्ष सोने विकत घेण्याच्या तुलनेत फार कमी असतात.

455

म्युच्युअल फंड सही आहे?