गुंतवणुकदारांना कायम एक प्रश्न सतावत असतो की मी माझ्या गुंतवणुकीच्या प्रगतीवर कसे लक्ष ठेवू.
हे म्हणजे क्रिकेटमधल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासारखे आहे. क्रिकेटच्या सामन्यामध्ये,नंतर बॅटिंग करणा-या संघाला सगळी गणिते माहिती असतातकिती धावा,किती गडी आणि किती षटके.
हेच आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणूक करताना सुद्धा लक्षात घ्यावे लागते. आर्थिक उद्दिष्टे म्हणजे लक्ष्य असलेली धावसंख्या आहे असे समजा-
- जी रक्कम आपल्याकडे आजपर्यंत जमा आहे, ती आपली आत्ता पर्यंतची धावसंख्या आहे समजा.
- जी रक्कम साध्य करायची आहे ती धाव संख्येचे लक्ष्य आहे, आणि उरलेला वेळ म्हणजे उरलेली षटके.
- विकेट्सची स्थिती आणि गोलंदाजांच्या दर्जाची वेगवेगळ्या धोक्यांच्या पातळीवर तुलना केली जाऊ शकते- मग ती राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी असेल, देशातील राजकीय स्थितीशी असेल, आंतरराष्ट्रीय भांडवलाचा वेग असेल, कायद्यातील बदल असतील, कर आणि नियमावली इत्यादींशी संबंधित असू शकेल.
- ह्या ठिकाणी धावफलक म्हणजे आपण म्युच्युअल फंड स्किम मध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला जो खात्याचा ताळेबंद हिशोब (अकाऊंट स्टेटमेंट) मिळेल
- काही ऑनलाईन साधने आणि मोबाईल अॅप्स आहेत ज्याआधारे आपण आपल्या गुंतवणूकीचे मूल्य म्हणजेच धावफलक तपासू शकता.
459