नरेंद्रला त्यांच्या नवीन घरासाठी डाऊन पेमेंट करता येईल एवढी रक्कम साठवायची आहे. त्यांनी काही म्युच्युअल फंड स्किम्स मध्ये एसआयपी करण्यास सुरुवात केली. जरी त्यांच्याकडे पैशाची कमतरता असली तरी त्यात जी भर पडत होती त्यात ते समाधानी होते.
त्यांच्या कंपनीने काही स्टार कमर्चा-यांना रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आणि त्यांचे नावही त्यात होते, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
त्यांच्या घर खरेदीसाठी जरी काही काळ जाणार असला, किती काळ लागेल ह्याबाबत त्यांना खात्री नव्हती. हे पैसे एका कालावधीसाठी नियोजित देखील केले जाऊ शकतात.
त्यांना त्या पैशाचे काय करता आले असते?
कमी कालावधीमध्येच पैशाची गरज असल्यास, आणि त्यासाठी लागणारा कालावधी अनिश्चित असल्यास गुंतवलेले पैसे काढता यावेत यासाठी अनुरूप अशा लिक्विड म्युचुअल फंड्सचा विचार करण्यास हरकत नाही. ते परिवर्तनशीलही आहेत, ज्यामुळे आपण थोडी रक्कम किंवा अगदी पूर्ण रक्कम सुद्धा गरज लागेल तेव्हा काढून घेऊ शकतो.
त्यामुळे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन असे भरपूर म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत.