म्युच्युअल फंडचा परतावा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, जसे आपण गुंतवणुकीसाठी निवडलेले मार्ग, निरनिराळ्या बाजारांची काम करण्याची पद्धत, फंड व्यवस्थापन टीमचे कौशल्य आणि गुंतवणुकीचा कालावधी.
यातील अनेक घटक अनिश्चित असल्यामुळे, परतावाबद्दल कोणतीही हमी देता येत नाही, याउलट मुदत ठेवी मध्ये हे घटक बहुतांश प्रमाणात नसतात.
मुदत ठेवी मध्ये - परतावा निश्चित असतो, फक्त एका निश्चित कालावधीसाठी. हा परतावा आणि त्याचा कालावधी, दोन्हीही जारी करणारी कंपनी ठरवते, गुंतवणूकदार नाही. म्हणूनच, जर एखाद्याला सहा वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल आणि मुदत ठेव पाच वर्षांसाठीच उपलब्ध असते, तर परतावा पाच वर्षांसाठीच माहिती असतो, पण संपूर्ण सहा वर्षांसाठी नाही. त्यामुळे, फक्त निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणुकांमध्येच गुंतवणुकीचा परतावा माहीत असतो, जिथे गुंतवणुकीची मुदतपूर्ती आणि गुंतवणूकदारांचा कालावधी हे तंतोतंत जुळतात.
इतर सर्व बाबतीत, गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या संपूर्ण कालावधीसाठी गुंतवणुकीवरील परतावा माहीत नसतो.