डेब्ट फंड्स मध्ये कोणी गुंतवणूक केली पाहीजे?

डेब्ट फंड्स मध्ये कोणी गुंतवणूक केली पाहीजे? zoom-icon

जर आपल्याला कोणी विचारले की जास्त प्रमाणात प्रथिने किंवा कर्बोदके किंवा जीवनसत्त्वे कोणी खाल्ली पाहिजेत तर तुमचे उत्तर काय असेल? 

सगळ्यांनीच! 

सगळ्यांनीच सगळ्या प्रकारची पोषक तत्त्वे खाणे गरजेचे आहे, पण प्रत्येक व्यक्तिच्या वयानुसार आणि शारीरिक गरजेनुसार त्याचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. उदाहरणार्थ, वाढत्या वयातील मुलांना प्रौढांपेक्षा जास्त प्रथिने आणि कर्बोदकांची गरज असते. त्यांना अधिक ऊर्जेने भरलेल्या कर्बोदकांची सुद्धा गरज असते. हेच तत्व आपल्या गुंतवणूक पोर्टफोलिओ साठी सुद्धा लागू पडते.

प्रत्येक व्यक्तीच्या गुंतवणूक पोर्टफोलिओ मध्ये इक्विटी, डेब्ट फंड्स, सोनं, स्थावर मालमत्ता आणि इतर मालमत्ता ह्यांची योग्य सुसंगती असणे गरजेचे आहे. पण प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येक मालमत्तेचे प्रमाण वेगळे असते. त्यामुळे, प्रत्येकाची काही प्रमाणात डेब्ट फंड्स सारख्या फिक्स्ड इन्कम अ‍ॅसेट्स मध्ये गुंतवणूक असणे गरजेचे आहे. तिशीतल्या तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरीकांनी त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये जास्त डेब्ट फंड्स ठेवले पाहिजेत. तरुणांमध्येही, पारंपारीक गुंतवणूकदाराने ज्याला कमी जोखीम पत्करायची आहे

अधिक वाचा