म्युच्युअल फंडाच्या विषयावर बोलताना तुम्ही एनएफओ बद्दल ऐकले असेलच जे न्यू फंड ऑफर चे संक्षिप्त रूप आहे. हे म्हणजे एखाद्या कंपनीने बाजारात नवीन उत्पादन आणण्यासारखे आहे. यामध्ये “उत्पादन” म्हणजे म्युच्युअल फंड योजना आणि एनएफओ म्हणजे एखाद्या नवीन योजनेत उपलब्ध करण्यात येणारी यूनिटस.
म्युच्युअल फंडामध्ये न्यू फंड ऑफर (एनएफओ) म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देताना आपण थोडक्यात असे म्हणू शकतो की ही कोणत्याही विद्यमान म्युच्युअल फंड किंवा नवीन म्युच्युअल फंडाने सुरू केलेली नवीन म्युच्युअल फंड योजना म्हणजे एनएफओ.
जेव्हा तुम्ही एनएफओमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही ते पैसे म्युच्युअल फंडाला देता आणि फंड मॅनेजर या पैशांचा वापर योजनेच्या उद्दीष्टांनुसार नक्की केलेल्या गुंतवणूकीसाठी करतात.
एनएफओ कालावधी दरम्यान, गुंतवणूकदार या नवीन योजनेतील युनिट्स निश्चित केलेल्या ऑफर प्राइस मध्ये खरेदी करू शकतात. (उदा.10 रुपये प्रती यूनिट). या मध्ये लोकांकडून आलेला पैसा नंतर एकत्रित करण्यात येतो. एनएफओ कालावधी संपल्यानंतर, योजनेच्या उद्दीष्टांनुसार विविध वित्तीय साधनांमध्ये या एकत्रित केलेल्या पैशांची गुंतवणूक करण्यास म्युच्युअल फंड सुरवात करतो. यामुळे गुंतवणूकदार सुरुवातीपासूनच या योजनेत सहभागी होऊ शकतात.
तथापि, एनएफओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची गुंतवणुकीची उद्दिष्टे काय आहेत आणि तुम्ही किती जोखीम घेऊ शकता याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे जेणेकरून ते योजनेच्या गुंतवणूकीच्या उद्दीष्टांनुसार आहे का याची खात्री करता येईल.
एनएफओ कालावधी दरम्यान, जो सहसा 15 दिवसांचा असतो, गुंतवणूकदार निश्चित केलेल्या ऑफर प्राइसने (उदा.10 रुपये प्रती यूनिट) नवीन योजनेचे यूनिटस खरेदी करू शकतो. फंड व्यवस्थापनाने दिलेल्या पर्यायांनुसार गुंतवणूकदार एकरकमी किंवा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) पद्धतीने गुंतवणूक करू शकतो.
गुंतवणूकीचा प्रवास सुरू करणाऱ्यांसाठी एनएफओ ही एक संधी आहे, परंतु काळजीपूर्वक मूल्यमापन करणे फार महत्वाचे असते.
अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.