म्युच्युअल फंड वितरक आणि गुंतवणूक सल्लागार यांत काय फरक आहे?

म्युच्युअल फंड वितरक आणि गुंतवणूक सल्लागार यांत काय फरक आहे?

एका प्रकारे, हे दोघेही आपल्याला गुंतवणुकी संबंधी निर्णय घेण्यास मदत करतात, ज्यात म्युच्युअल फंड स्किम्स निवडण्याचाही समावेश असतो. पण, त्यांच्या नावाप्रमाणेच, म्युच्युअल फंड वितरक फक्त म्युच्युअल फंड उत्पादनांकडेच अधिक केंद्रीत असतात, तर गुंतवणूक सल्लागार आपल्याला इतर उत्पादने आणि सेवा यांबद्दलही सांगू शकतात.

याचा अर्थ असा आहे का, की म्युच्युअल फंड वितरक गुंतवणूकदारांना फक्त कमीशन कमावण्याच्या दृष्टीने म्युच्युअल फंड स्किम विकू शकतील? तसे तर, या बाबतीत नियम फार कडक आहेत. जर एखाद्या म्युच्युअल फंड वितरकाने अशी म्युच्युअल फंड स्किम विकली जी गुंतवणूकदारासाठी योग्य नव्हती, तर त्याला "अयोग्य-विक्री” म्हणजेच "मिस-सेलिंग” असे म्हटले जाईल, हा एक एक प्रकारे गुन्हा आहे.

म्युच्युअल फंड वितरकाने गुंतवणूकदाराची परिस्थिती/ जोखीम स्वरुप समजून घेऊन त्याला त्याच साधनांची शिफारस करावी ज्यांची गुंतवणूकदाराला त्या वेळी गरज आहे. तर दुसरीकडे, गुंतवणूक सल्लागार संपूर्ण परिस्थितीकडे पाहतील, ज्यात गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे, दायित्वांचे, मिळकतीचे आणि खर्चांचे मूल्यमापन केले जाईल, आणि त्यानुसार साधने सुचवली जातील.

हे दोघेही नोंदणीकृत असतात आणि त्यामुळे त्यांचे विनियमन सुद्धा केले जाते. गुंतवणूकदारांची नोंदणी थेट सेबी (SEBI) कडे होते, तर म्युच्युअल फंड वितरकांची नोंदणी एएमएफआय (AMFI) कडे होते - असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया, जी म्युच्युअल फंड उद्योग जगताची संबंधित संस्था आहे.

452

म्युच्युअल फंड सही आहे?