एकदा गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला की त्याला कोणत्या स्किम मध्ये गुंतवणूक करायची आहे -फिक्स्ड इन्कम फंड, इक्विटी की फंड, बॅलन्स्ड आणि कोणत्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) मार्फत गुंतवणुक करायची आहे? हे ठरवावे लागते.
सर्वप्रथम, आपल्या उद्दिष्टांविषयी आपल्या म्युचुअल फंड वितरकाशी/गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करणे, कोणता कालावधी आपल्यासाठी योग्य आहे, आणि यामध्ये जोखीम काय असेल हे जाणून घेणे महत्वाचे असते.
ह्या माहितीच्या आधारे कोणत्या फंडमध्ये गुंतवणुक करायची ह्याचा निर्णय घेता येईल.
- जर आपले दिर्घकालीन उद्दीष्ट असेल, म्हणजे-निवृतीनंतरचे नियोजन आणि त्यात थोडी जोखीम पत्करण्याची तयारी असेल, तर इक्विटी किंवा बॅलन्स फंड आपल्यासाठी आदर्श आहेत.
- जर आपले अगदी लघुकालीन उद्दीष्टे असतील जसे- दोन महिन्यांसाठी पैसे बाजुला ठेवायचे आहेत; तर लिक्विड फंड उत्तम असेल.
- जर आपली कल्पना नियमित उत्पन्न मिळवण्याची असेल तर मंथली इन्कम प्लॅन किंवा इन्कम फंड घेण्याचा सल्ला दिला जाईल.
एकदा कोणत्या
अधिक वाचा