सर्वच गुंतवणुकींमध्ये गुंतवणूक करताना चुका होऊ शकतात, आणि म्युच्युअल फंड्स याला अपवाद नाहीत.
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करताना होणाऱ्या काही सामान्य चुका पुढीलप्रमाणे:
- उत्पादन नीट समजून न घेता गुंतवणूक करणे: उदाहरणार्थ, इक्विटी फंड्स हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केला जातो, पण गुंतवणूकदारांना अल्पमुदतीमध्ये सहज चांगला परतावा हवा असतो.
- जोखमीतील घटक जाणून न घेता गुंतवणूक करणे: सर्व म्युच्युअल फंड स्किम्समध्ये काही जोखमीचे घटक असतातच. गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक करण्याआधी ते समजून घेतले पाहिजेत.
- योग्य रकमेची गुंतवणूक न करणे: काही वेळा लोक निष्काळजीपणे गुंतवणूक करतात, त्यासाठी त्यांचे काही नियोजन किंवा उद्दिष्ट नसते. अशा वेळी, केलेल्या गुंतवणुकीचा योग्य परिणाम साधला जात नाही.
- फार लवकर रोख रकमेत रुपांतरीत करुन घेणे: काही वेळा गुंतवणूकदारांचा धीर सुटतो किंवा ते एखाद्या गुंतवणुकीला परतावा देण्यासाठी आवश्यक वेळ देत नाहीत आणि वेळेआधीत रोख रकमेत त्याचे रुपांतर करुन घेतात.
- कळपाप्रमाणे वागणे: अनेकदा गुंतवणूकदार स्वतःची विवेकबुद्धी वापरत नाहीत आणि 'बाजार’ किंवा 'मीडिया’ मधील अफवा ऐकून वाहावत जातात, आणि त्यामुळे चुकीची निवड करतात.
- नियोजन न करता गुंतवणूक करणे: ही बहुधा सर्वात मोठी चूक ठरते. गुंतवलेल्या प्रत्येक रुपया मागे नियोजन आणि उद्दिष्ट असणे गरजेचे आहे.
452