लॉक-इन कालावधी म्हणजे काय?

लॉक-इन कालावधी म्हणजे काय? zoom-icon

काही प्रकारचे म्युच्युअल फंड तुमच्या गुंतवणुकीवर ‘लॉक-इन कालावधी’ लागू करतात. यामध्ये इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस), डेट फंडांमधील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (एफएमपी) आणि क्लोज्ड एंडेड म्युच्युअल फंडांचा समावेश आहे. लॉक-इन कालावधी म्हणजे असा किमान कालावधी ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक ठेवणे आवश्यक असते. त्या कालावधीत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड युनिट्स रिडीम किंवा विक्री करू शकत नाहीत.  

म्युच्युअल फंड स्कीमच्या प्रकारानुसार लॉक-इन कालावधी बदलू शकतो. उदाहरणार्थ, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) हा एक कर वाचवणारा म्युच्युअल फंड आहे ज्याचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा आहे. याचा अर्थ तुम्ही गुंतवणुकीच्या तारखेपासून तीन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांचे युनिट्स विकू किंवा रिडीम करू शकत नाही. त्याचप्रमाणे, काही क्लोज्ड-एंडेड म्युच्युअल फंडांचा लॉक-इन कालावधी स्कीमच्या ऑफर डॉक्युमेंटमध्ये नमूद केलेला असू शकतो. याशिवाय तीन वर्षांहून अधिक काळ मालकीच्या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा लाँग टर्म कॅपिटल गेन (दीर्घकालीन भांडवली नफा - एलटीसीजी) म्हणून वर्गीकृत केला जातो. एलटीसीजीसाठी(LTCG) कराचा दर नियमित उत्पन्नावर लागू होणार्‍या दरापेक्षा कमी आहे (व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नावर अवलंबून). त्यामुळे तीन वर्षांहून अधिक काळ लॉक-इन कालावधी फायदेशीर ठरू शकतो.

मात्र, बहुतेक ओपन एंडेड म्युच्युअल फंडांमध्ये लॉक-इन कालावधी नसतो. तुम्ही त्यांच्या युनिट्सची कधीही खरेदी आणि विक्री करू शकता.

डेट फंडातील फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन्ससाठी तुम्हाला तुमची गुंतवणूक लॉक-इन कालावधीपर्यंत म्हणजेच निश्चित कालावधीसाठी राखून ठेवावी लागते. त्या कालावधीनंतर, तुम्ही तुमचे युनिट्स रिडीम करू शकता. हा लॉक-इन कालावधी कर नियोजनासाठी नाही तर मूलभूत कर्ज मालमत्तेवरील उत्पन्न वसूल करण्यासाठी आहे, जे मॅच्युरीटीपर्यंत ठेवले पाहिजे.

लॉक-इन कालावधी सहसा अल्पकालीन ट्रेडिंग आणि सट्टेबाजीला परावृत्त करण्यासाठी लागू केला जातो. तो तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याची सवय लावण्यास मदत करतो. 

लॉक-इन कालावधीचे महत्त्व

  1. तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतो
  2. बाजार कोलमडतो तेव्हा अविचारीपणे बाहेर पडणे टाळतो
  3. फंड मॅनेजर्सना कामगिरीवर लक्ष केंद्रित करू देतो
  4. परताव्यातील अस्थिरता कमी करतो

लॉक-इन कालावधीनंतर फंडाच्या प्रकारानुसार तुमची गुंतवणूक लगेच विकण्याऐवजी तिचे मूल्यमापन करा. जर ती तुमच्या अपेक्षा पूर्ण करत असेल तर तुम्ही ती गुंतवून ठेवणे किंवा आणखी गुंतवणूक करणे देखील निवडू शकता.

म्युच्युअल फंड स्कीम्सना आपल्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांशी जुळवून आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन अवलंबून, तुम्ही ती साध्य करण्यासाठी चक्रवाढीच्या शक्तीचा फायदा घेऊ शकता.

अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

282
285