म्युच्युअल फंड म्हणजे काय?

Video

अनेक लोकांना म्युच्युअल फंड फार गुंतागुतीचे किंवा भीतीदायक वाटू शकतात. आम्ही आपल्याला हा विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेषतः, म्युच्युअल फंडमध्ये पुष्कळ लोकांचा (म्हणजे गुंतवणूकदारांचा) पैसा एकत्र आणला जातो. या निधीचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड व्यवस्थापक करतात.

ही एक व्यवस्था आहे जी, ज्यांची गुंतवणुकीची उद्दिष्टे समान अशा अनेक गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्याचे काम करते. नंतर ही व्यवस्था त्या पैशाला इक्विटी, बाँड, रोखे बाजारातील उपकरणे आणि/ किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवते. प्रत्येक गुंतवणूकदाराला युनिट्स दिले जातात, हे युनिट्स त्या निधीतील त्यांचा भागाचे प्रतिनिधित्व करत असतात. स्किमच्या "नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू किंवा एनएव्ही" ची गणना करून त्यातून खर्चांसाठी काही भाग वजा करून, या एकत्रित निधीतून झालेला लाभ/ मिळकत सर्व गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या अनुपाताने वाटली जाते. थोडक्यात सांगायचे झाले, तर म्युच्युअल फंड सामान्य माणसासाठी सर्वात योग्य अशी गुंतवणूक आहे कारण यात विविध क्षेत्रांमध्ये, व्यावसायिक व्यवस्थापन केलेल्या अनेकविध सिक्युरिटीजमध्ये, कमी खर्चात गुंतवणूक करण्याची संधी मिळते.    

452
453
मी गुंतवणूक करण्यासाठी तयार आहे

म्युच्युअल फंड सही आहे?