रिस्क-ओ-मीटर म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे स्तर कोणते?

रिस्क-ओ-मीटर म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे स्तर कोणते?

रिस्क-ओ-मीटर हे म्युच्युअल फंडांसाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने सुरू केलेले प्रमाणित रिस्क मेज़रमेंट स्केल आहे. रिस्क-ओ-मीटर सर्व म्युच्युअल फंड योजना दस्तऐवजांमध्ये ठळकपणे प्रदर्शित केले जाणे आवश्यक आहे जेणेकरून गुंतवणूकदारांना त्या विशिष्ट फंडाशी संबंधित रिस्क समजून घेता येतील.

रिस्क-ओ-मीटर सहा वेगळ्या स्तरांमध्ये जोखमीचे वर्गीकरण करते. यामध्ये कमी, कमी ते मध्यम, मध्यम, मध्यम उच्च, उच्च आणि अतिशय उच्च यांचा समावेश आहे. डावीकडील चित्र पहा.

कमी जोखीम: या वर्गवारीत येणार्‍या फंडांना त्यांच्या मूळ सिक्युरिटीजमुळे सर्वात कमी रिस्क असते, ज्यामुळे ते काही प्रमाणात भांडवली संरक्षण शोधणार्‍या गुंतवणूकदारांसाठी योग्य ठरतात.

कमी ते मध्यम जोखीम: हे अशा गुंतवणूकदारांसाठी आहेत जे मध्यम ते दीर्घ मुदतीत माफक परतावा मिळविण्यासाठी थोडासा धोका पत्करण्यास तयार आहेत. बहुतेक अल्ट्रा-शॉर्ट कालावधीचे फंड या श्रेणीत येतात.

मध्यम जोखीम: थोडी जोखीम घेऊन त्यांचा पोर्टफोलिओ उत्तम करण्याचे उद्दिष्ट असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हे योग्य आहेत. बहुतेक डायनॅमिक बाँड फंड या श्रेणीत येतात.

मध्यम उच्च जोखीम: या फंडांमध्ये काहीशी उच्च पातळीची जोखीम असते आणि थोडीशी जास्त जोखीम प्रोफाइल असलेल्या गुंतवणूकदारांना अनुकूल असू शकते. हे त्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत जे उच्च वाढ किंवा नफा संभाव्यतेच्या बदल्यात थोडी अनिश्चितता आणि अधिक अस्थिरता स्वीकारण्यास तयार आहेत.

उच्च जोखीम: या कैटेगरीतील फंड प्रामुख्याने इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात. संभाव्य लाभासाठी उच्च जोखीम पत्करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ते योग्य ठरतात.

अतिशय उच्च जोखीम: ते अत्यंत उच्च जोखीम असलेले फंड आहेत जे अस्थिर स्टॉक किंवा परदेशी म्युच्युअल फंड युनिट्समध्ये गुंतवणूक करतात. उच्च-जोखीम, उच्च-उत्पन्न गुंतवणुकीत गुंतवणूक करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हे योग्य आहेत.

अस्वीकरण

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

452