म्युच्युअल फंडातील ट्रेलिंग आणि रोलिंग रिटर्न्स म्हणजे काय?

म्युच्युअल फंडातील ट्रेलिंग आणि रोलिंग रिटर्न्स म्हणजे काय?

म्युच्युअल फंडाची कामगिरी कशी आहे हे त्यातून मिळणारा परतावा किंवा त्याच्या कामगिरी वरून समजते, आणि म्युच्युअल फंडांचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन सर्वात महत्वाच्या कामगिरी मेट्रिक्स म्हणजे:

(अ) ट्रेलिंग रिटर्न्स
(ब) रोलिंग रिटर्न्स

तर, आता आपण म्युच्युअल फंडात परतावा मोजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या दोन पद्धतींमागील संकल्पना काय आहेत हे समजून घेऊ आणि त्यामधील फरक समजून घेऊ. अशा पद्धतीने काढलेल्या परताव्यांची तुलना संबंधित मापदंडांशी केल्यानंतर त्यांची कामगिरी त्यापेक्षा खराब अथवा उत्तम असल्याचे दिसते.

ट्रेलिंग रिटर्न्स:
दोन विशिष्ट तारखांदरम्यान म्युच्युअल फंडाची कामगिरी कशी आहे हे पाहण्याचे साधन म्हणजे ट्रेलिंग रिटर्न्स, ट्रेलिंग रिटर्न्सला “पॉइंट-टू-पॉइंट” रिटर्न्स देखील म्हणतात. ठराविक कालावधीमध्ये फंडाची कामगिरी कशी होती याची माहिती यामध्ये मिळते, ती विशिष्ट कालावधीसाठी काढता येते उदा. एक वर्षापूर्वीपासून चालू तारखेपर्यंत, एक वर्ष, तीन वर्षे आणि त्यापलिकडे, अगदी सुरुवातीच्या दिवसापासून आज पर्यन्त.  

रोलिंग रिटर्न्स:
रोलिंग रिटर्न्स, ज्याला कधीकधी "रोलिंग पीरियड रिटर्न्स" किंवा "रोलिंग टाइम पीरियड्स" म्हणतात, म्हणजेच ठराविक कालावधीसाठी विशिष्ट वर्षाअखेरीस मोजले जाणारे सरासरी वार्षिक रिटर्न्स. गुंतवणूकदारांना गुंतवणूक काळात आलेल्या वास्तविक अनुभवांनुसार विशिष्ट कालावधी दरम्यान म्युच्युअल फंडांची कामगिरी कशी होती हे सांगणारे उत्तम साधन म्हणजे रोलिंग रिटर्न्स. पोर्टफोलिओचे किंवा फंडाच्या रोलिंग रिटर्नचे मूल्यमापन केल्याने भूतकाळातील वेगवेगळ्या कालावधींमध्ये फंडाची कामगिरी कशी होती याचा उत्तम अंदाज येतो.

म्युच्युअल फंडाचे रोलिंग रिटर्न काढण्यासाठी फंडाच्या कामगिरीचे विविध ओव्हरलॅपिंग कालावधींमध्ये विश्लेषण केले जाते, सामान्यत: विशिष्ट कालावधींसाठी, जसे की दररोज, साप्ताहिक किंवा मासिक आणि या प्रत्येक कालावधीसाठी सरासरी वार्षिक परतावा काढला जातो. 

थोडक्यात सांगायचे झाल्यास, ट्रेलिंग रिटर्न्स विशिष्ट कालावधीसाठी फंडाच्या भूतकाळातील कामगिरीचे मोजमाप करतात, तर रोलिंग रिटर्न्स विविध ओव्हरलॅपिंग कालावधींमधील कामगिरीचे विश्लेषण करून फंडाच्या कामगिरीचे जास्त गतिशील चित्र प्रदर्शित करतात. या मेट्रिक्समुळे गुंतवणूकदारांना फंडाची सातत्यता समजते आणि म्युच्युअल फंडाच्या भविष्यातील परताव्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यात मदत होते.

अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.
 

285