म्युच्युअल फंडच्या किंमती वर-खाली होण्याकडे लक्ष देणे योग्य का नाही?

Video

एखाद्या लांब पल्ल्याच्या ड्राइव्हच्या वेळी आपण आपला वेग किंवा आपल्याला नक्की कुठे जायचे हे किंवा तिथे आपण कसे पोहोचणार याची काळजी करता का? हे तर स्पष्टच आहे की आपण रस्त्यातील खड्ड्यांचा विचार करत नाही, तर त्या ठिकाणी वेळेवर आणि सुरक्षित कसे पोहोचायचे याचा विचार करता. म्युच्युअल फंडचे तसेच आहे. आपल्याला रोजच्या एनएव्हीमधील बदलाची काळजी करण्याची गरज नसते, आपल्याला फक्त हे पहायचे असते की या स्कीमसोबत आपण ठरवलेल्या कालावधीमध्ये आपल्या आर्थिक उद्दिष्टाच्या जवळ पोहोचणार आहात किंवा नाही.

ड्राइव्ह करत असताना अनेक वेळा आपला वेग अगदी शून्याच्या जवळ जातो, पण खड्डा निघून गेला की वाहनाचा वेग पुन्ही वाढतो आणि आपण आपला प्रवास सुरू ठेवता. प्रवास संपल्यावर याला अधिक महत्त्व असते की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपला सरासरी वेग किती होता. त्याचप्रमाणे कमी कालावधीमध्ये एखाद्या म्युच्युअल फंडच्या प्रवासात अनेक खाच-खळगे असू शकतात, पण आपली गुंतवणूक त्यात जेवढा अधिक काळ असेल, त्या खाच-खळग्यांचा प्रभाव तेवढाच कमी होतो आणि चांगला परतावा मिळण्याची आपली शक्यता तेवढीच वाढते - हे लांब ड्राइव्ह केल्यावर आपल्या कारचा सरासरी वेग काढण्यासारखे आहे. 

प्रत्येक अर्थतंत्र आणि त्याच्या अनुषंगाने मार्केटमध्ये तेजी आणि मंदी असे दोन्ही कालखंड येतात ज्यामुळे आपल्या फंडच्या परताव्यावर त्याचा प्रभाव पडतो, पण फक्त कमी कालावधीसाठी. दीर्घ कालावधीमध्ये आपला फंड अशा अनेक चढ-उतारांमधून निघालेला असेल, पण त्याचा प्रभाव कमी असेल कारण आपल्या गुंतवणुकीच्या शेवटी एकूण दीर्घकालासाठी चक्रवाढ परताव्याचे महत्त्व अधिक असेल.

454
475

म्युच्युअल फंड सही आहे?