फार उतर-चढ होत असलेल्या मार्केटमध्ये आपला एसआयपी प्लॅन सुरू का ठेवावा?

Video

जेव्हा मार्केटमध्ये फार अधिक चढ-उतर होत असते तेव्हा अनेक गुंतवणूकदारांना अशी शंका येते की गुंतवणूक करण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता की नाही, आणि ते एसआयपी थांबवण्याचा किंवा पैसे काढून घेण्याचा विचार करू लागतात. अशा अस्थिर बाजारात आपली गुंतवणूक नुकसान दाखवत असताना काळजी वाटणे साहजिकच आहे. पण विशेष करून मार्केट खाली जात असताना एसआयपी सुरू ठेवणे शहाणपणाचे लक्षण आहे कारण अशा वेळेला आपल्याला तेवढ्याच रकमेच्या बदल्यात अधिक यूनिट मिळतात. आपल्याला सर्वांनाच स्वस्त वस्तू खरेदी करायला आवडते, मग ते ऑनलाइन सेल असो किंवा भाजीवाल्याकडे असो. हो ना? तर भाव कमी होत असताना आपण म्युच्युअल फंडच्या बाबतीत तसे का करू नये?

मार्केटबद्दल भाकीत करणे तर हवामानाचा अंदाज बांधण्यापेक्षा सुद्धा अधिक कठीण आहे. आपण एकरकमी गुंतवणूक करण्यासाठी मार्केट पडण्याची योग्य वेळ ठरवून तसे करू शकत नाही. आपण गुंतवणूक केल्या नंतर जर मार्केट आणखी पडले तर?

अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?