एकाच गुंतवणुकीद्वारे फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडस् लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडस् मध्ये प्रवेश देतात. या इक्विटी म्युच्युअल फंड योजना ओपन-एंडेड असून वेगवेगळ्या क्षेत्रांतील बाजार भांडवल असलेल्या कंपन्या निवडण्यात फंड व्यवस्थापकाला मोकळीक प्रदान करतात.
फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडस् कंपनीच्या आकाराचे किंवा प्रकाराचे बंधन न ठेवता कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकतात. हा वैविध्यपूर्ण दृष्टिकोन फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड्सला सर्व गुंतवणूकदारांसाठी आकर्षक गुंतवणूक पर्याय बनवतो.
फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. काही मुख्य फायदे खालीलप्रमाणे:
- डायवर्सिफिकेशन: तुमचे पैसे वेगवेगळ्या जोखीम आणि परतावा देणार्या स्टॉकमध्ये फ्लेक्सी कॅप फंडस् च्या सोबतीने गुंतवले जातील.
- फ्लेक्सिबिलिटी/मोकळीक: विविध क्षेत्र आणि बाजार भांडवलांमधील कोणत्याही आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची मोकळीक हे फंडस् देतात. विस्तृत व्याख्येसह, फंड व्यवस्थापकांकडे बेंचमार्कपेक्षा चांगला परतावा मिळवून खरेदी आणि विक्री करण्यासाठी भरपूर स्टॉक असतात.
- डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन: फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडामध्ये, फंड व्यवस्थापक बाजार परिस्थितीच्या आधारे लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप मधील अलोकेशनमध्ये बदल/सुधारणा करू शकतो. अनुकूल दृष्टीकोन फंड्सला बाजारातील बदलत्या डायनामिक्सला/गतीशीलतेला प्रतिसाद आणि उत्तम परतावा निर्माण करण्याची अनुमती देतो.
- प्रोफेशनल मॅनेजमेंट: फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही प्रोफेशनल फंड व्यवस्थापकांचे कौशल्य आणि ज्ञानाचा फायदा मिळवू शकता.
अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.