कालावधी आणि जोखमीचे स्वरूप या आधारे सर्व डेब्ट फंडांमध्ये ओव्हरनाइट फंड हे लिक्विड फंडांच्या खालोखाल असतात. ओव्हरनाइट फंड लगेच दुसऱ्या दिवशी ज्यांची मुदत-पूर्तता होणार अशा रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. लिक्विड फंड 91 दिवसांच्या आत मुदत-पूर्तता होणार अशा रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे, लिक्विड फंडांवर व्याजदराचा, क्रेडिटचा आणि कर्ज-पूर्ततेमध्ये कसूर होण्याचा जोखीम ओव्हरनाइट फंडांपेक्षा अधिक असतो, कारण ओव्हरनाइट फंडांचा पैसा लगेच दुसऱ्या दिवशी पतर मिळतो जेव्हा फंड व्यवस्थापक पूर्तता होत असलेले रोखे विकतात.
ओव्हरनाइट फंडांमध्ये तुमचा अतिरिक्त पैसा एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी ठेवणे अधिक चांगले कारण त्यांत निर्गमन भार नसतो. लिक्विड फंडांमध्ये सुरुवातीच्या सहा दिवसांसाठी निरनिराळे निर्गमन भार असतात आणि 7व्या दिवसापासून निर्गमन भार नसतो. लिक्विड फंड 91 दिवसांमध्ये पूर्तता होणाऱ्या कुठल्या ही रोखे बाजार उपकरणांत, जसे सीडी आणि सीपी मध्ये गुंतवणूक करू शकतात, मग त्यांची क्रेडिट प्रत कशीही असो. त्यामुळे, त्यांत ओव्हरनाइट फंडांपेक्षा अधिक क्रेडिट जोखीम असतो.
लिक्विड फंडांना त्यांतील रोख्यांचा पूर्तता कालावधी अधिक असल्यामुळे क्रेडिट जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी ओव्हरनाइट फंडांपेक्षा अधिक वाव असतो, त्यामुळे त्यांचा परतावा ओव्हरनाइट फंडांपेक्षा अधिक असण्याची शक्यता असते. जर तुम्हाला कुठल्याही क्षणी पैशाची गरज उद्भवू शकते आणि त्यामुळे पैसा काढून घेण्याची सोय तुमच्यासाठी सर्वोपरि आहे, तर ओव्हरनाइट फंड निवडणे योग्य ठरेल. जर तुम्हाला तुमचे अतिरिक्त पैसे एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी ठेवताना परतावा सुद्धा पाहिजे असेल, तर लिक्विड फंड निवडावेत.