सर्व म्युच्युअल फंडांमध्ये ओव्हरनाइट फंड सर्वात सुरक्षित समजले जातात. जर आपण म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे सुरू करीत असाल आणि नंतर आपल्याला संपूर्ण गुंतवणूक करायची असेल तर ओव्हरनाइट फंड आपल्यासाठीच आहेत.
ओव्हरनाइट फंड एक प्रकारच्या ओपन एंडेड डेब्ट स्किमसारखे असतात जे दुसऱ्या दिवशी पूर्ण होणाऱ्या डेब्ट रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. म्हणजेच, यातील रोख्यांचे पैसे दररोज फंडला मिळत जातात आणि फंड व्यवस्थापक त्या पैशाने असे नवीन रोखे पोर्टफोलिओसाठी खरेदी करतात ज्यांची पूर्तता लगेच दुसऱ्या दिवशी होणार असते. या फंडांतील रोख्यांची पूर्तता दुसऱ्या दिवशीच होणार असल्यामुळे, या फंडांमध्ये व्याज दराचा जोखीम किंवा कर्जाच्या परतफेडीमध्ये कसूर होण्याचा जोखीम इतर डेब्ट फंडांपेक्षा फारच कमी असतो. जोखमीचे स्वरूप अशा प्रकारे कमी असल्यामुळे त्यांतील परतावा सुद्धा सर्वात कमी असतो.
ओव्हरनाइट फंड अशा व्यवसायिकांसाठी किंवा उद्योजकांसाठी योग्य आहेत ज्यांना फार कमी कालावधीसाठी मोठी रक्कम ठेवायची असते आणि ती
अधिक वाचा