जर आपल्याला कोणी विचारले, की मी कोणती गाडी घेऊ, एसयूव्ही की प्रिमियम हॅशबॅक, आपला सल्ला काय असेल? कदाचित आपण विचाराल, की गाडी विकत घेण्याचे आपले मुख्य कारण काय आहे? आपल्याला कुटुंबासह लांबच्या प्रवासाला जायचे आहे, की नियमितपणे शहरातील रस्त्यांवरून चालवण्यासाठी एखादे वाहन हवे आहे? आता ज्याप्रमाणे आपली गाडीची निवड आपल्या आवश्यकतांवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड्स गुंतवणूकीच्या बाबतीत ग्रोथ किंवा डिव्हीडंट्स यांची निवड देखील पहिल्यांदा आपण गुंतवणूक का करत आहात यावर अवलंबून असते.
जर आपण दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल, तर आपल्याला लांबच्या प्रवासासाठी एसयूव्ही ची गरज असते. आपण निवडलेल्या फंडच्या ग्रोथ पर्यायात गुंतवणूक करा. काळाबरोबर फंडचे उत्पन्न जमा आणि चक्रवाढ होत जाते आणि त्याचा एनएव्ही देखील वाढतो, जो आपल्याला विक्री केल्यानंतर जास्त परतावा देतो. पण आपण म्युच्युअल फंड्स मधून आपल्या नियमित उत्पन्नाला पूरक म्हणून इतर स्त्रोतांमधून काही परतावे मिळवण्यासाठी शोधात असाल, तर डिव्हीडंट्स पेआऊट चा पर्याय निवडा. गुंतवणूकदाराच्या हातात डिव्हीडंट्स करमुक्त असतात. दोन पर्यायांमध्ये निवड करण्या आधी करांचा होणारा परिणाम समजून घ्या आणि आपल्या आर्थिक गरजांसाठी कोणता पर्याय योग्य आहे ते बघून दोन पर्यायांमध्ये योग्य ती निवड करा.