गुंतवणुकीमधील नव्या युगाचे डिजिटल ट्रेंड्स: किती सफल होतात

गुंतवणुकीमधील नव्या युगाचे डिजिटल ट्रेंड्स: किती सफल होतात

तंत्रज्ञानामधील प्रगतीमुळे वित्तीय सेवा क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. आज आपण पैसे देण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि अगदी गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा ऑनलाईन व्यवहार करू शकतो.

स्वाभाविकपणे, व्यवहार करण्यास सोप्या असणाऱ्या, भौतिक स्वरूपात अस्तित्वात नसलेल्या व्हर्च्युअल ॲसेट्ससारखे डिजिटल ट्रेंड्स ह्यामुळे उदयास आले आहेत. हे शासनाद्वारे किंवा केंद्रीय बँकेकडून तयार केलेले किंवा जारी (निर्गमित) केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा वापर पैशासारखा किंवा कायदेशीर चलनासारखा करता येत नाही. परंतु, काही जोखमी आहेत: 

-    अशा डिजिटल ॲसेट्सचे मूल्य खऱ्याखुऱ्या मत्तांशी (ॲसेट्सशी) जोडलेले नसते. परिणामत:, त्यांचे मूल्य - आणि तुमची गुंतवणूक, परिणामत: - अतिशय अस्थिर होऊ शकते.
-    व्हर्च्युअल ॲसेट्स विनियमित नसतात (शासनाच्या नियंत्रणाखाली नसतात) शासकीय नियमनांशिवाय, गुंतवणूकदार फसवणुकीला बळी पडू शकतात आणि त्यांचे पैसे गमावून बसू शकतात.
-    सध्या, ह्या व्हर्च्युअल ॲसेट्सवर केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ अन्वये सर्वाधिक कर लावले जातात.

तुलनेने, म्युच्युअल फंड्स १९२४ पासून अस्तित्वात आहेत. गेल्या शतकभरात, म्युच्युअल फंडांचे विनियमन व्यवस्थित झाले आहे आणि गुंतवणूकदाराच्या रक्षणासाठी त्यांच्यावर जवळून देखरेख केली जाते. विविध उत्पन्नाच्या आणि जोखमीच्या गरजांशी अनुकूल असणाऱ्या पुरेशा योजना (स्कीम्स) उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, त्यांमध्ये वैविध्य अंगभूत  असते, ज्यामुळे गुंतवणूकादाराची जोखीम कमी होते. म्युच्युअल फंड्सचा आणखी एक लाभ असा की गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांपैकी त्यांवर सर्वांत कमी कर बसतो. (म्युच्युअल फंड्सवर कर कसा लागू होतो हे तुम्ही इथे वाचू शकता.)

नव्या ट्रेंड्सना नवलाईचे मूल्य नेहमी लाभते. त्यामुळे ते गुंतवणूकदारांना आकर्षक वाटू शकतात. परंतु, तुम्ही कष्टाने कमावलेले पैसे गुंतवण्यापूर्वी जोखमींची पारख करून पाहणे महत्त्वाचे असते. व्यवस्थित संशोधन करा आणि तुमच्या जोखमीच्या पातळीशी व उत्पन्नाच्या अपेक्षांशी एखादा गुंतवणुकीचा पर्याय अनुकूल आहे का हे ठरवा. गुंतवणुकीचे निर्णय आयुष्यभरासाठी केले जातात आणि अशा निवडी करण्यासाठी थोडा वेळ देणे योग्य आहे.

454