ULIP म्युच्युअल फंडपेक्षा कसे वेगळे आहे?

ULIP म्युच्युअल फंडपेक्षा कसे वेगळे आहे? zoom-icon

ULIP म्हणजे युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. ही आयुर्विमा पॉलिसी आहे, ज्यामध्ये एक गुंतवणुकीचा घटक असतो, ज्याची विविध बाजारपेठांमध्ये गुंतवणूक केली जाते. ह्या गुंतवणूक घटकांपासून मिळणारा परतावा हा ह्या पॉलिसीचे मूल्य ठरवतो. परंतु, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर मिळणारी रक्कम ही बाजारपेठेचा घटक असेलच असे नाही. मिळणाऱ्या किमान रकमेवर कदाचित मिळणा-या रकमेवर ह्याचा काही परिणाम होत नाही. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर, ULIP हे हायब्रीड उत्पादन आहे, ज्यात गुंतवणूक आणि विमा ह्यांचा मेळ घातलेला आहे.

ULIP मधील गुंतवणूक पर्याय हा म्युच्युअल फंडासारखा आहे.

1. दोन्हीही व्यवस्थापित गुंतवणुकी आहेत.

2. दोन्हीसाठी, व्यावसायिकांचा गट गुंतवणूक आणि विशिष्ट उद्देशाने फंड मध्ये केलेली गुंतवणूक ह्यांचे व्यवस्थापन करत असतो.

3. गुंतवणूकदारांना खरेदी करताना युनिट्स दिलेले असतात आणि त्याला ठराविक कालावधीने घोषित केलेली प्रति युनिट NAV असते.

ULIP ही विमा पॉलिसी असल्यामुळे, जर प्रिमियम नियमित भरला जात नसेल तर विमा कवच स्थगित केले जाऊ शकते.

म्युच्युअल फ़ंड मध्ये, एनएव्ही ठरवण्याआधी सगळे खर्च लागू केले जातात, तर ULIP मध्ये, काही खर्च हे म्युच्युअल फंड प्रमाणे, तर काही गुंतवणूकदाराच्या खात्यातील कमीत कमी युनिट रद्द करून आकारले जातात.

एका ULIP उत्पादनामध्ये फंडचे एकापेक्षा जास्त पर्याय असू शकतात आणि गुंतवणूकदार ह्या फंड्स मध्ये स्थलांतर करू शकतो. परंतु, काही स्किम्स मध्ये वर्षभरातील ह्या मोफत स्थलांतरावर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. म्युच्युअल फंड मध्ये, एका फंड मधून दुसर्‍या फंड मध्ये आपण कितीही वेळा स्थलांतर करू शकता पण ते देखील आपण कोणत्या स्किम मधून बाहेर पडताय त्यावर अवलंबून आहे कारण त्यावर कदाचित एक्झिट लोड (निर्गमन भार) असूही शकतो किंवा नसूही शकतो.

454