म्युच्युअल फंड्स आणि पोर्ट्फोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस(PMS) हे गुंतवणुकदारांना, व्यावसायिक फंड व्यवस्थापक सांभाळत असलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून, स्टॉक्स आणि बॉन्ड्समध्ये गुंतवणुक करण्याची परवानगी देतात हे दोन्हीही गुंतवणुकीचे विभिन्न पर्याय आहेत, ज्यांची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत आणि दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत.
कोणीही व्यक्ती म्युच्युअल फंड मध्ये दर महिना कमीत कमी 500/- रुपयानेही गुंतवणुक करु शकते, पण पीएमएस(PMS) स्किम्स मध्ये कमीत कमी रु.25 लाखाची गुंतवणूक करावी लागते, कारण ते सर्वप्रथम एचएनआय(HNI) ला समोर ठेवून तयार केलेले संपत्ती व्यवस्थापन उत्पादन आहे. म्युच्युअल फंड्स वर सेबीचे नियंत्रण असते तर पीएमएस(PMS) स्किम्स साठी कोणत्याही कडक नियमांचे बंधन नसते. तसेच, पीएमएस (PMS) उत्पादने ही त्यातील जोखमीचे ज्ञान असलेल्या अनुभवी गुंतवणूकदारांसाठी आहेत, त्यामुळे PMS फंड्स हे सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात, ज्यामध्ये बाजारात सहजासहजी व्यवहार होण्याची शक्यता नसते. म्युच्युअल फंड्स अशा सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतात ज्या रोख
अधिक वाचा