म्युच्युअल फंड्स बाबत आपण नेहमी ऐकत असतो, ‘जितकी जास्त जोखीम, तितका जास्त परतावा’. यामध्ये सत्य आहे का?
जर ‘जोखमी’चे मूल्यमापन एकतर भांडवलाच्या तोट्याची संभाव्यता किंवा गुंतवणुकीच्या मूल्यामधील हेलकावे किंवा चढउतार असे केले, तर इक्विटी सारखे असेट क्लासेज नि:संशय सर्वाधिक जोखमीचे आहेत, आणि बँकेतील बचत खात्यातील किंवा सरकारी बाँड्मधील पैसे हे कमी जोखमीमध्ये असतात.
म्युच्युअल फंडच्या जगात लिक्विड फंड हा सर्वात कमी जोखमीचा असतो आणि इक्विटी फंड हा सर्वाधिक जोखमीचा असतो.
म्हणूनच इक्विटी मध्ये गुंतवणूक करण्याची एकमेव अपेक्षा, सर्वाधिक फायदा हिच असेल. परंतु, जे इक्विटीचा काळजीपूर्वक अभ्यास करून, संयम राखून दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करतात त्यांना जास्त परतावे मिळतात. प्रत्यक्षात इक्विटी मधील जोखीम ही विविधीकरण करून तसेच दीर्घ गुंतवणूक कालावधी ठेवून कमी करता येते.
म्युच्युअल फंड्सच्या प्रत्येक विभागात वेगवेगळ्या प्रकारची पत जोखीम, व्याजदराची जोखीम, लिक्विडीटीची जोखीम, बाजार/किमतीतील जोखीम, व्यवसायातील जोखीम, घटनांमधील जोखीम, नियमिततेची जोखीम इ. असते. आपल्या वित्त तज्ञाची जसे कि आपल्या फंड वितरक/गुंतवणूक सल्लागाराकडून अथवा फंड व्यवस्थापकाकडून घेतलेली यासंदर्भातील योग्य वैविध्यपूर्ण माहिती, आपणास हे प्रश्न सोडविण्यास सहाय्यक ठरू शकते.