हो, आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टांचे नियोजन करण्यात मदत करण्यासाठी म्युच्युअल फंड्स आदर्श आहेत.
- श्री. राजपूत ह्यांचा 15-20 वर्षांनंतर निवृत्त झाल्यानंतर शहरापासून दूर हिल स्टेशनवरील फार्महाऊस वर स्थायिक होण्याचा विचार आहे.
- श्रीमती. पटेल ह्यांना कोणतेही निवृत्तीचे आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. जरी त्यांच्याकडे त्यांची काही बचत असली, तरी त्यांना आता त्यांचा नियमित खर्च भागवण्यासाठी नियमित उत्पन्नाची गरज आहे.
- श्रीमती. शर्मा ह्यांच्याकडे त्यांना त्यांच्या व्यवसायातून मिळालेले अतिरिक्त पैसे आहेत आणि ते त्यांच्या बँक खात्यात तसेच निष्क्रिय ठेवलेले आहेत. त्यांना त्यांच्या सप्लाइअर्ज़ आणि कर्मचारी वर्गाला काही दिवसांनंतर पैसे देणे गरजेचे आहे.
वरील सगळ्या परिस्थिती ह्या आयुष्यातील वास्तववादी घटना आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
हो! म्युच्युअल फंड्स!
म्युच्युअल फंड्स हे गुंतवणुकीच्या विविध उद्दिष्टांसाठी विविध प्रकारच्या स्किम्स देत असतात. उदा-
- दिर्घकालीन निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पैसे उभे करण्यासारखी उद्दिष्टांसाठी -त्यासाठी आपण इक्विटी आणि बॅलन्स्ड फंडांचा विचार करु शकता
-
अधिक वाचा