स्मॉल-कॅप मुच्युअल फंडस म्हणजे काय?

स्मॉल-कॅप मुच्युअल फंडस म्हणजे काय?

स्मॉल-कॅप म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंडाच्या अशा योजना ज्यामध्ये म्युच्युअल फंड त्यांच्या एकूण मालमत्तेच्या किमान 65 टक्के रक्कम स्मॉल-कॅप कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. स्मॉल-कॅप कंपन्यां म्हणजे अशा कंपन्या ज्यांचे बाजार भांडवल साधारणपणे 100 कोटी रुपयांपेक्षा कमी असते, बाजार भांडवलानुसार पहिल्या 250 कंपन्यांमध्ये नसलेल्या कंपन्यां, त्यांची व्याख्या बाजार मध्यस्थांनुसार वेगळी असू शकते.

स्मॉल ​कॅप म्युच्युअल फंडांची​ वैशिष्ट्ये

  • प्रगतीची उत्तम संभाव्यता (उच्च वाढ क्षमता) असलेल्या स्मॉल ​कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक.
  • कंपन्यांच्या सुरुवातीच्या विकासाच्या टप्प्यामुळे अस्थिरता आणि जोखीम.
  • बाजारात तेजी असताना मिड आणि लार्ज कॅप फंडांना मागे टाकू शकते, बाजारात मंदी असताना खराब कामगिरीची शक्यता.
     

स्मॉल ​कॅप म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक का करावी?

  • चांगल्या वाढीची संभाव्यताः उत्तम वाढ आणि वैविध्यपूर्ण संधी असलेल्या प्रगतिशील व्यवसायांमध्ये गुंतवणूक.
  • अंडरव्हॅल्युड असेट्स: कमी वाढीच्या संभाव्यतेमुळे, किंमत कमी असताना छोट्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांची वाढ होऊन दीर्घकालीन परतावा मिळू शकतो.
  • विलीनीकरण आणि अधिग्रहण (एम अँड ए):​ लहान कंपन्याना मोठ्या कंपनीमध्ये विलीन होण्याची चांगली संधी असते, ज्यामुळे मोठ्या कंपन्यांमध्ये विलीन झाल्याने फायद्याची शक्यता जास्त असते.
     

तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता हवी असल्यास, धोका पत्करण्याची इच्छा असेल आणि दीर्घकालीन आर्थिक संधींचा शोध घेऊ इच्छित असल्यास, स्मॉल - कॅप म्युच्युअल फंड्स ऊतम पर्याय ठरू शकतात. तथापि, गुंतवणूक करण्याआधी तुमच्या किती जोखीम घेऊ शकता याचा अंदाज घ्या, फंड कशा प्रकारे गुंतवणूक करतो, त्यांची आधीची कामगिरी याचा अभ्यास करा आणि गुंतवणूकीच्या आधी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा

अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

284