म्युच्युअल फंड्सचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत?

Video

वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी असतात. हे मुख्यत्वे तीन प्रकारचे असतात.

  1. इक्विटी किंवा ग्रोथ फंड्स

  • हे प्रामुख्याने इक्विटीज मध्ये म्हणजेच कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात.
  • यांचे प्राथमिक उद्दिष्ट संपत्ती निर्माण करणे किंवा भांडवलाचे अधिमूल्यन करणे हे असते.
  • त्यांच्यामध्ये मोठे परतावे मिळवण्याची क्षमता असते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते सर्वोत्तम असतात.
  • याची उदाहरणे म्हणजे
  • “लार्ज कॅप” फंड्स जे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुस्थापित असतो.
  • “मिड कॅप” फंड्स जे मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
  • “स्मॉल कॅप” फंड्स हे लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
  • “मल्टी कॅप" फंड्स जे मोठ्या, मध्यम आणि लहान अशा मिश्र कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.
  • “सेक्टर" फंड्स हे एकाच प्रकारचा व्यवसाय असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. उदा. तंत्रज्ञान फंड्स हे तंत्रज्ञान विषयक कंपन्यांमध्येच गुंतवणूक करतात. 
  • “थेमॅटिक” फंड्स जे एका सामाईक थीम मध्येच गुंतवणूक करतात. उदा. इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स जे अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात ज्यांना पायाभूत
अधिक वाचा

म्युच्युअल फंड सही आहे?