मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप फंड्समध्ये काय फरक आहे?

मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप फंड्समध्ये काय फरक आहे? zoom-icon

जर आपण मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप फंडमधील फरकाबद्दल विचार करत असलात, तर आपण ऑक्टोबर 2017 मध्ये निघालेले सेबीचे प्रॉडक्ट कॅटेगरायझेशन सर्क्युलर पाहू शकता जे जून 2018 पासून लागू झाले आहे. या सर्क्युलरमध्ये मल्टी कॅप फंड्सना त्यांच्या एकूण मालमत्तेचा 65% भाग लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुतंवण्याचे स्वातंत्र्य दिले गेले होते. तसेच सप्टेंबर 2020 मध्ये सेबीने मल्टी कॅप फंड्सना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये प्रत्येकी किमान 25% गुंतवणूक करणे सक्तीचे केले. याचे कारण असे होते की मल्टी कॅप फंड्समध्ये गुंतवणूकदारांना अधिक डायव्हर्सिफिकेशन मिळाले पाहिजे. पण यामुळे फंड व्यवस्थापकांना त्यांच्या दृष्टीकोनाप्रमाणे संधीचा फायदा घेणे नेहमी जमत नाही कारण काही वेळा असे असू शकते की यापैकी एखाद्या सेगमेंटमध्ये कमी गुंतवणूक करणे त्यांच्या दृष्टीने योग्य असू शकते पण तरीही त्यांना किमान 25% गुंतवणूक करण्याचा नियम मोडता येत नाही.

म्हणूनच नोव्हेंबर 2020 मध्ये सेबीने फ्लेक्झी कॅप फंड सुरू केले जे मल्टी कॅप फंडसारखेच असतात पण त्यांना गुंतवणुकीसाठी अधिक स्वातंत्र्य असते. मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप फंड्समध्ये मुख्य फरक हा आहे की फ्लेक्झी कॅप फंड्सना आपल्या एकूण गुंतवणुकीचा 65% भाग इक्विटी आणि इक्विटी संबंधित रोख्यांमध्ये ठेवत असताना लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समधील गुंतवणुकीची टक्केवारी पाहिजे तशी बदलता येते. उदाहरणार्थ, जर फंड व्यवस्थापकाला असे वाटते की आर्थिक मंदीच्या काळात स्मॉल कॅपमधील गुंतवणूक कमी करावी, तर त्यांच्यासाठी स्मॉल कॅप गुंतवणूक शून्यावर आणून लार्ज कॅप / मिड कॅप मधील गुंतवणूक वाढणे शक्य असते. पण मल्टी कॅप फंड अशा प्रकारे गुंतवणूक करू शकणार नाही.

ज्या गुंतवणूकदारांना असे वाटते की एकूण आर्थिक परिस्थिती कशीही असो, सर्व मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये गुंतवणूक करून ठेवली पाहिजे आणि स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप स्टॉक्समध्ये एक निश्चित गुंतवणूक केलेली असली पाहिजे, त्यांच्यासाठी मल्टी कॅप फंड योग्य आहेत. ज्या गुंतवणूकदारांना अधिक स्वातंत्र्य असलेले गुंतवणूक धोरण पाहिजे असेल ज्यात विविध मार्केट कॅपिटलायझेशनवर विशेष लक्ष न ठेवता बाजाराच्या कलाप्रमाणे त्यांतील गुंतवणूक पाहिजे तशी कमी-जास्त करता येईल, तर त्यांच्यासाठी फ्लेक्झी कॅप फंड योग्य आहेत.

453

म्युच्युअल फंड सही आहे?