कुणीतरी असे विचारल्याची कल्पना करा: वाहने कोणत्या वेगाने धावतात?
वाहन, या संपूर्ण वर्गासाठी आपण एकच सामान्य उत्तर देऊ शकता का? वेगवेगळी वाहने वेगवेगळ्या वेगाने धावतात – जरी ती वाहन या एकाच प्रकारात मोडत असली तरी, उदा. मोटारी, मोटार ही शहरांतील रस्त्यासाठी बनली असल्यामुळे ती एका ठराविक कमाल वेगाने धावेल, एखादी रेसिंगसाठी असलेली मोटार जास्त वेगाने धावू शकेल.
इथे म्युच्युअल फंड नावाचे एकच उत्पादन नाहीये, इथे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्सचे प्रकार आहेत. वेगवेगळ्या वर्गातील म्युच्युअल फंड्स मधून येणारे परतावे वेगवेगळे असतात आणि काही फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यांची कामगिरी उच्च पातळीवरची अनिश्चितता दर्शविते.
जर म्युच्युअल फंड्स, जिथे किमतीमध्ये खूपच चढ-उतार होत आहेत अशा बाजारात गुंतवणूक करत असतील, तर त्या फंडच्या नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) मध्ये मोठे चढ-उतार दिसू शकतात (उदा. इक्विटी फंड्स मध्ये गुंतवणूक करणारे ग्रोथ फंड्स); परंतु, जर त्यांनी जिथे जास्त चढ-उतार होत नाहीत, अशा बाजारात गुंतवणूक केली, तर त्या फंडची नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) बऱ्याच प्रमाणात स्थिर असेल (उदा. मनी मार्केट मध्ये गुंतवणूक करणारे लिक्विड फंड्स). दुसर्या शब्दात, एक लिक्विड फंड, इक्विटी फंडच्या तुलनेत बरीच कमी अनिश्चितता दाखवतील.
एका गुंतवणूकदाराला फंडच्या वैशिष्ट्यांचे स्वरूप आणि स्वतःच्या गरजांबरोबर ते जुळवून घेण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.