म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे आता एवढे सोपे झालेले आहे की फारशी कागदपत्रे न देता सुद्धा आपण अनेक फंडमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल विचार करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यांना केव्हायसी पूर्ण करावे लागते, ही एकदाच करण्याची प्रक्रिया आहे. आपण एखाद्या वितरकाकडे किंवा गुंतवणूक सल्लागाराकडे जाऊन केव्हायसी पूर्ण करण्यास मदत मागू शकता किंवा आपण ऑनलाइन ई-केव्हायसी पूर्ण करू शकता. म्युच्युअल फंडच्या दुनियेची किल्ली केव्हायसी आहे. एकदा केव्हायसी पूर्ण केल्यावर आपण कुठल्याही फंडमध्ये गुंतवणूक करू शकता, त्यासाठी प्रत्येक वेळी इतर तपासणी किंवा सत्यापनाची गरज नसते.
केव्हायसी सत्यापन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण गुंतवणूक करण्यासाठी तयार असता, तेव्हा आपण म्युच्युअल फंड वितरक, नोंदणी केलेले गुंतवणूक सल्लागार, स्टॉक मार्केटमधील ब्रोकर, बँक किंवा इतर आर्थिक मध्यस्थाच्या मदतीने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. पण जर आपल्याला स्वतः गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, तर आपण एखाद्या फंड हाउसच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता
अधिक वाचा