इंडेक्स फंड्स हे अक्रिय म्युच्युअल फंड्स असतात जे बाजारातील लोकप्रिय इंडेक्सचे अनुकरण करतात. फंडचा पोर्टफोलिओ निर्माण करण्यासाठी उद्योग आणि स्टॉकची निवड करण्यात फंड व्यवस्थापक सक्रिय भूमिका वठवत नाहीत, तर फक्त ज्या इंडेक्सचा पाठपुरावा करायचा आहे, त्या इंडेक्स मधील सर्व स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करतात. फंडमधील स्टॉक्सचा अधिभार त्या इंडेक्स मधील प्रत्येक स्टॉकच्या अधिभाराबरोबर काटेकोरपणे जुळतो. यालाच अक्रिय गुंतवणूक म्हणतात म्हणजेच फंड व्यवस्थापक फंडचा पोर्टफोलिओ तयार करताना फक्त इंडेक्सचे अनुकरण करीत असतात आणि नेहमी आपला पोर्टफोलिओ त्या इंडेक्स प्रमाणेच असू देण्याचा प्रयत्न करतात.
जर त्या इंडेक्स मधील एखाद्या स्टॉकचा अधिभार बदलला, तर फंड व्यवस्थापकाला त्याच्या पोर्टफोलिओ मधील अधिभार इंडेक्स मधील अधिभाराप्रमाणे ठेवण्यासाठी स्टॉक मधील युनिट्सची खरेदी किंवा विक्री करावी लागते. जरी अक्रिय गुंतवणूकीचा पाठपुरावा करणे सोपे असले, तरीही ट्रॅकिंग एरर मुळे फंडचा परतावा त्या इंडेक्स प्रमाणेच असेल असे नाही.
इंडेक्स मधील सिक्युरिटीजचा वाटा नेहमीच
अधिक वाचा