गुंतवणुकीच्या आदर्श रकमेबद्दल अनेक प्रश्न भावी गुंतवणूकदारांच्या मनामध्ये असतात. लोकांना वाटते की म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीच्या इतर प्रकारांसारखेच आहेत. पण खरोखर तसे आहे का? म्युच्युअल फंड मुदत ठेव, डिबेंचर किंवा कंपनीच्या शेअर्सप्रमाणे गुंतवणुकीचा प्रकार आहेत का?
म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा एक मार्ग नसून गुंतवणुकीच्या अनेक मार्गांवरून धावणाऱ्या गाडीप्रमाणे आहेत.
याचा विचार अशा प्रकारे करा. जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टोरंटमध्ये जाता, तेव्हा तुमच्याकडे पाहिजे ते पदार्थ मागवणे किंवा बुफे/ थाली किंवा संपूर्ण जेवण मागवणे असे पर्याय असतात.
तर संपूर्ण थाली किंवा जेवण म्युच्युअल फंडसारखे असल्याचा विचार करा, तर स्वतंत्र मागवलेले पदार्थ म्हणजे स्टॉक, बाँड इत्यादी आहेत असा विचार करा. थाली मागवल्यावर आपली निवड सोपी होते, वेळ वाचतो आणि काही अंशी पैशाची बचत सुद्धा होते.
महत्त्वाचे म्हणजे, गुंतवणुकीला सुरुवात लवकर करावी, अगदी कमी प्रमाणात सुद्धा चालेल, आणि आपली मिळकत वाढेल त्याप्रमाणे आपल्या गुंतवणुकीमध्ये भर घालावी. अशाने दीर्घकालामध्ये आपल्याला चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते.