म्युच्युअल फंड्स आणि इंडेक्स फंड्स दोन्हीही अनेक स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करून विविधीकरण देतात. सांगितलेल्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टाप्रमाणे परतावा देण्यासाठी म्युच्युअल फंड कडे स्टॉक निवडायची सोय असते, तर इंडेक्स फंड्स एका विशिष्ट इंडेक्सचा पाठपुरावा करतात. त्यामुळे इंडेक्स फंड्स त्यांच्या इंडेक्समधील स्टॉक मध्येच गुंतवणूक करू शकतात. इंडेक्स फंड त्यांच्या पोर्टफोलिओसाठी कुठला स्टॉक निवडायचा याचा निर्णय सक्रियपणे घेत नाहीत, त्यामुळे त्यांना अक्रिय व्यवस्थापित फंड्स म्हटले जाते.
इंडेक्स फंड्सचा कल बाजाराच्या सरासरीप्रमाणे परतावे देण्याकडे असतो त्याचवेळी सक्रिय व्यवस्थापन असलेले म्युच्युअल फंड्स त्यांच्या पोर्टफोलिओसाठी स्टॉक सक्रियपणे निवडण्याचा निर्णय घेऊन अल्फा (मापदंडापेक्षा अधिक परतावा) देण्याच्या प्रयत्नात असतात. जे इंडेक्स फंड्स फक्त एका इंडेक्सचा पाठपुरावा करतात आणि त्या इंडेक्सशी समन्वय साधून परतावे निर्माण करतात त्यांच्या तुलनेमध्ये अधिक अपेक्षित परतावे मिळण्यासाठी जोखमीची अधिक किंमत मोजावी लागते.
सक्रिय व्यवस्थापन असलेल्या फंडचा कल अधिक व्यवस्थापन शुल्क आकारण्याकडे असतो आणि त्यामुळे त्यांचे खर्च अधिक असतात कारण त्यांना फंड व्यवस्थापक नियुक्त करण्यासाठी मोठे शुल्क मोजावे लागते. अशा फंड्स मध्ये व्यवहाराचा खर्च देखील अधिक असतो कारण त्यांना सक्रियपणे विनिमय करणे भाग असते, तर इंडेक्स फंड्सना त्यांच्या पोर्टफोलिओसाठी कमी व्यवहार करावे लागतात. यामुळेच इंडेक्स फंड्स इतर म्युच्युअल फंडपेक्षा अधिक कर-कुशल असतात. सक्रिय व्यवस्थापन असलेले फंड्स लाभ मिळवण्यासाठी जेव्हा पोर्टफोलिओ मधील सिक्युरिटीज विकतात तेव्हा कॅपिटल गेन म्हणजे भांडवली लाभ मिळतो. हा भांडवली लाभ जेव्हा गुंतवणूकदारांपर्यंत येतो, तेव्हा त्यांची कॅपिटल गेन टॅक्स वरील दायित्व वाढते.