डायनॅमिक बाँड फंडस् म्हणजे काय?

डायनॅमिक बाँड फंडस् म्हणजे काय? zoom-icon

डायनॅमिक बाँड फंड म्हणजे गुंतवणूकीच्या कालावधीचे व्यवस्थापन करण्याच्या फ्लेक्सिबिलिटीसाठी प्रसिद्ध असलेले डेट फंड प्रकारातील फंड होय. व्याजदरातील बदलांचा फायदा घेऊन परतावा वाढविणे हे यांचे प्राथमिक उद्दिष्ट असते. चालू व्याजदराचा कल कसा आहे त्यानुसार फंडाच्या पोर्टफोलियो मधील बॉन्डच्या मुदतीमध्ये बदल करून फंड व्यवस्थापक हे साध्य करतात. डायनॅमिक बाँड फंडामध्ये बाजारातील गतिशीलता आणि व्याजदरातील चढउताराच्या अनुषंगाने विविध प्रकारचे बाँड, मॅच्युरिटी आणि क्रेडिट गुणवत्ता यांच्यादरम्यान ट्रान्झिशन करण्याची क्षमता असते.


शिवाय, डायनॅमिक बाँड फंड व्यवस्थापकाच्या व्याजदरांबद्दलच्या दृष्टिकोनावर आधारित त्यांच्या पोर्टफोलिओचा कालावधी जुळवून घेतात. यामुळे जास्त मुदतीच्या प्रोफाईलची कामगिरी वेगवेगळ्या अल्पमुदतीतील कामगिरीमध्ये बदलते. तथापि, वाढलेल्या कालावधीमध्ये हे फंड वेगवेगळ्या व्याज दर चक्रांशी जुळवून घेतात ज्यामुळे संभाव्यतः जास्त परतावा मिळतो. डायनॅमिक बॉण्ड्सच्या काही प्राथमिक वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला डायनॅमिक बॉण्ड्स बद्दल माहिती मिळते.


जोखीम: डायनॅमिक बॉण्ड्स मध्ये सहसा मध्यम स्वरूपाची जोखीम असते. 

व्याजदर: बॉन्डच्या किमती आणि व्याजदर यांच्यातील बदल परस्पर विरोधी असतात; दरात वाढ झाली की बॉन्डच्या किमती कमी होतात आणि दर कमी झाले की बॉन्डच्या किमती वाढतात. 


अस्वीकरण
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखीमीच्या अधीन आहेत, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.

285

म्युच्युअल फंड सही आहे?