डेब्ट फंड्स मध्ये गुंतवणूक का करावी?

डेब्ट फंड्स मध्ये गुंतवणूक का करावी?

आपल्याला आपल्या शरीराची एकूण वाढ आणि स्वास्थ्य लक्षात घेता संतुलित आहार घेणे गरजेचे असते. 

शरीराला स्वतःला स्वस्थ आणि आरोग्यवान ठेवण्यासाठी निरनिराळ्या पोषक तत्त्वांची गरज असते आणि एकाच प्रकारच्या जेवणाने आवश्यक असलेली सर्व पोषक तत्त्वे मिळत नाहीत. म्हणूनच आपल्या शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ योग्य प्रमाणात खावे लागतात. आपल्या शरीर-स्वास्थ्यासाठी प्रत्येक पोषक तत्त्वाची खास भूमिका असते (उदाहरणार्थ, कर्बोदके लगेच ऊर्जा देतात, तर प्रथिने पेशींच्या विकासाचे आणि दुरुस्तीचे काम करतात). 

तसेच, आयुष्यात गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ सुद्धा संतुलित असल्याने आपले वित्तीय स्वास्थ्य सुधारते. पोर्टफोलिओमध्ये अशा विविध प्रकारच्या मालमत्तांचे मिश्रण असावे लागते ज्या आपल्या आहारातील पोषक तत्त्वांप्रमाणेच विविध भूमिका वठवतात. आपल्याला वित्तीय सुरक्षा आणि भरभराटीसाठी इक्विटी, स्थिर मिळकत, सोने आणि स्थावर मालमत्ता अशा विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करावी लागते. काही प्रकारच्या मालमत्तांमध्ये जसे की स्थिर मिळकत, ज्यात बाँड आणि रोखे बाजारातील उपकरणे वगैरे मध्ये गुतंवणूक करणे वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी कठीण ठरु शकते. त्याऐवजी, आपण अशा डेब्ट फंड्समध्ये गुंतवणूक करावी जे अशा सिक्युरिटीजमध्ये गुतंवणूक करतात. यांत आपल्याला कमी, पण तुलनात्मक दृष्ट्या स्थिर परतावा मिळतो, ज्यामुळे आपला इक्विटी, सोने आणि स्थावर मालमत्ता असलेला पोर्टफोलिओ संतुलित होतो.

460