कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी विचार करण्याच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे तुमचा "अपेक्षित कालावधी", म्हणजेच दिवस, महिने किंवा वर्षांचा काळ ज्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे.
आणि हे ठरवणे इतके महत्त्वाचे का आहे?
सर्व गुंतवणुकी आदर्शदृष्ट्या एखाद्या वित्तीय किंवा गुंतवणुकीच्या योजनेनुसार करायला पाहिजेत. अशा योजनांमुळे आपल्याला कळते की एखादे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साधारण किती काळ लागेल.
एका अशा गुंतवणूकदाराचे उदाहरण पाहूया ज्याला काही स्थावर मिळकत विकल्यामुळे रु. 50 लाख मिळाले आहेत. या पैशाचे काय करायचे हे ठरवण्याआधी त्याला हा पैसा काही काळ एका सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये लिक्विड फंड एक आदर्श स्किम ठरेल, कारण हे अशा पद्धतीने तयार केलेले असतात की ते लिक्विडिटी म्हणजे पैसे हवे तेव्हा काढण्याची सोय देतात ज्यात भांडवलाच्या सुरक्षिततेची शक्यता सुद्धा अधिक असते. त्यांना त्यांचा विचार नक्की झाल्यावर लगेच पैसे काढता येतील.
त्यामुळे, आपल्याला किती काळ गुंतवणूक
अधिक वाचा