म्युच्युअल फंड्ससाठी टॅक्स (कर) संबंधी नियम आणि तरतुदी काय आहेत?

म्युच्युअल फंड्ससाठी टॅक्स (कर) संबंधी नियम आणि तरतुदी काय आहेत? zoom-icon

म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकींवर कॅपिटल गेन टॅक्स आकारला जातो. जेव्हा आपण म्युच्युअल फंडाच्या युनिट विकता/ काढून घेता तेव्हा आपल्याला झालेल्या नफ्यावर हा कर आकारला जातो. हा नफा म्हणजे विकलेल्या दिवशीचे स्किमचे नेट अ‍ॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) आणि खरेदी केलेल्या दिवशीचे एनएव्ही यांतील फरक होय (विक्रीची किंमत - खरेदीची किंमत). कॅपिटल गेन टॅक्सचे गुंतवणुकीच्या कालावधीप्रमाणे विभाजन केले जाते. इक्विटी फंड्ससाठी (ज्या फंड्समध्ये इक्विटीचा वाटा >=65% असतो), त्यांच्यासाठी एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीला दीर्घकाल म्हटले जाते आणि त्यावर दीर्घकालीन कॅपिटल गेन टॅक्स (एलटीसीजी) आकारला जातो. 

जर एका वित्तीय वर्षामध्ये एकूण कॅपिटल गेन रु. 1 लाखापेक्षा अधिक असले तर इक्विटी फंडवर 10% एलटीसीजी आकारला जातो. आर्थिक नियोजन करताना लक्षात ठेवा की रु. 1 लाखांपर्यंत तुमचा लाभ कर-मुक्त असतो. हा कर 31 जानेवारी 2018च्या नंतर केलेल्या सर्व गुंतवणुकींसाठी लागू आहे. इक्विटी फंडमधील एका वर्षापेक्षा

अधिक वाचा