काही लोकांना सुरक्षित राहावेसे वाटते आणि ते त्यासाठी तसेच पर्याय निवडतात. समजा, आपण एखाद्या नवीन रेस्टोरंटमध्ये गेलात. मेन्युमध्ये अनेक अनोळखी डिशेस आहेत, पण तरीही आपण नेहमीचे पदार्थच ऑर्डर करता कारण नवीन काही खाऊन निराशा व्हायला नको. आपण आपला नेहमीचा ‘पनीर काठी रोल’ मागवता कारण ‘कुसकुस पनीर सॅलड’ बद्दल आपल्याला शाश्वती नसते. पण तरीही आपल्याला त्या नवीन रेस्टोरंटमधील सेवा, वातावरण आणि पदार्थांचा आस्वाद घेताना त्या रेस्टॉरंट बद्दलची कल्पना येते.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे कुठल्याही रेस्टोरंटमध्ये मेन्यूमधील योग्य पदार्थ मागवण्यासारखेच असते. जर आपल्याला शेअर मार्केटपासून लांब राहायचे असेल, तरीही आपण आपल्या आर्थिक उद्दीष्टांच्या पूर्तीसाठी डेब्ट फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंड्सना साधारणपणे त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या आधारे इक्विटी, डेब्ट आणि हायब्रिड, सोल्युशन ओरीएंटेड स्किम्स आणि इतर स्किम असे विभागले जाते.
जर आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंड्सद्वारे शेअर्समध्ये गुंतवणूक करायची नसेल, तरीही आपण म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे घेण्यासाठी डेब्ट फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता, जे बँका, कॉर्पोरेट आणि रिझर्व बँकेसह सरकारने जारी केलेल्या बाँड्समध्ये, तसेच रोखे बाजाराच्या उपकरणांमध्ये जसे की कमर्शियल पेपर, बँक सीडी, टी-बिल इत्यादींमध्ये गुंतवणूक करतात. डेब्ट फंड आपल्याला आपल्या पैशाची वाढ करण्यास अधिक चांगली मदत करतात कारण त्यांतील परतावा आपल्या पारंपरिक बँक एफडी, पीपीएफ आणि पोस्ट ऑफिसातील बचत योजनांपेक्षा करलाभाच्या दृष्टीने अधिक चांगला देतात.
जे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड योग्य आहेत का?
454