सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) या अर्थाने समान आहेत की ते ठराविक कालांतराने नियमित गुंतवणूक करण्यास मदत करतात. मात्र, त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपण हे दोन्ही स्वतंत्रपणे आणि एसआयपी आणि एसटीपीमधील फरक समजून घेऊ शकतो.
1. एसआयपी: एसआयपी हा म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचा एक प्रकार आहे. यात गुंतवणूकदार नियमित अंतराने जसे दैनंदिन, साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक आणि इतर प्रकारे कोणत्याही म्युच्युअल फंड योजनेत ठराविक रक्कम गुंतवू शकतो. म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचा हा पद्धतशीर आणि शिस्तबद्ध प्रकार आहे.
2. एसटीपी: एसटीपीमध्ये गुंतवणूकदार एका म्युच्युअल फंड योजनेतून त्याच फंड हाऊसच्या दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेत पैसे हस्तांतरित करू शकतो. एसटीपीद्वारे तुम्ही पूर्वनिर्धारित कालांतराने एका म्युच्युअल फंड योजनेतून दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेत हस्तांतरित केली जाण्याची एक ठराविक रक्कम ठरवता. ही पध्दत अशा गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे ज्यांना एकरकमी गुंतवणूक करायची असते परंतु अस्थिरता कमी
अधिक वाचा